Land record 2024: आपल्या शेत जमिनीचे सरकारी भाव ठरवण्याचे निकष काय आणि ते कोठे पाहता येतात?

Land record: मित्रांनो सध्याच्या काळामध्ये शेत-जमिनीचे भाव आभाळाला भीडत चालले आहेत. म्हणूनच प्रत्येकजण जमीनीत पैसे अडकवून गुंतवणूक करतात असतात. जमीन घेऊन ठेवली तर ते दुसऱ्या पिढीला उपयोगी पडेल या विचाराने अनेकजण जमिन विकत घेतात. परंतु जमिनीचे खरेदी विक्री व्यवहार करताना त्या जमिनीचे दर देखील माहिती असणे आवश्यक असत. हे दर सरकारने ठरवलेले असतात. या शासकीय दरांपेक्षा कमी दराने आपण जमीन खरेदी विक्री करु शकत नाही. आज आपण आपल्या जमिनीचे सरकारी भाव कसे ठरतात आणि कोठे पाहता येतात याबद्दल संपूर्ण माहिती आज आपण या लेखाच्या माध्यमातून मिळविणार आहोत.

आपल्या जमिनीचे सरकारी दर कोण ठरवतात?

भारतात प्रत्येक राज्यात महसूल विभाग हा असतोच. या महसूल विभागामार्फतच प्रत्येक राज्यातिल जमिनींचे दर ठरवले जातात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आता कोणत्याही राज्यातील किंवा कोणत्याही राज्याच्या जिल्ह्यातील जमिनींचे दर Land record ऑनलाइन तपासण्याची सुविधा उपलब्ध आहे. अनेकांना असा प्रश्न पडला असले की हे रेडीरेकनरचे (Ready Reckoner Rates in Maharashtra for 2024) दर कोण ठरवतं आणि कशाच्या आधारे हे दर ठरवण्यात येतात जाणून घ्या..

  • राज्यातील जमीनीचे आणि मालमत्तेचे शासकीय दर हे महाराष्ट्र महसूल विभागामार्फतच ठरवण्यात येतात.
  • दर ठवण्यासाठी त्या भागाचा सर्वेक्षण करुन त्या जमिनीचे Land record दर ठरतात.
  • एखाद्याच्या जमिनीमधून एखादा शासकीय प्रकल्प जाणार असेल तर त्या प्रकल्पामध्ये ज्या नागरिकांच्या जमिनी गेल्या आहे, त्यांना रेडी रेकनरच्या दरांपेक्षाही अधिक किंमतीने पैसे शासनातर्फे देण्यात येतात.
  • शासनातर्फे हा नियम यासाठी तयार करण्यात आला आहे की ज्यांच्या जमीनी शासकीय प्रकल्पांत गेल्या त्यांना कोणत्याही प्रकारचे नुकसान सोसावे लागू नये.
  • एखाद्या शासकीय प्रकल्पासाठी त्या भागातील प्रकल्पग्रस्तांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये याकरिता तेथील जमिनी धारकांना रेडीरेकनच्या दुप्पट-तिप्पट दर देण्यात येतो.

जमिनीचे सरकारी दर मिळवणे आहे अत्यंत सोपे

सध्याच्या काळात प्रत्येकाला अगदी घरच्या घरी बसून ऑनलाईन पद्धतीने सर्व माहिती मिळवायची असते. म्हणूनच शासनाने ज्या त्या भागातील रेडीरेकनरचे दर ऑनलाईन उपलब्ध करुन दिले असल्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या शासकीय कार्यालयातील फेऱ्या मारणे टाळता येणे शक्य झाले आहे. शिवाय अनेकदा जमिनीचे सरकारी दर जाणून घेण्यासाठी शासकीय अधिकारी पैसे देखील मागतात, त्यामुळे जमिनीचे ऑनलाईन पद्धतीने दर मिळविण्याच्या सुविधेमुळे भ्रष्टाचाराला आळा बसला आहे.

असे पहा ऑनलाईन जमिनीचे दर

  • तुम्हाला तुमच्या जमिनीचे शासकीय दर जाणून घ्यायचे असतील तर https://igrmaharashtra.gov.in/ या लिंकवर क्लिक करुन महाराष्ट्र शासन नोंदणी व मुद्रांक विभाग या अधिकृत वेबसाईटला भेट द्या,
  • ज्या जमिनीचे शासकीय दर तुम्हाला काढायचे आहेत त्याचा तालुका, गाव, गट क्रमांक ही सर्व माहिती भरा आणि तुमच्या जमिनीचे दर मिळवा.

या प्रकारे मोजली जाते जमीन? Land record

जमीन मोजण्याची एक निराळी पद्धत असते, आणि त्यानुसारच त्या भागातील जमिनीचे दर ठरवण्यात येतात. जमिनीचे दर ठरवतात असताना चौरस फुट, गुंठा, एकर अशी मापने आहेत, आणि शासकीय पद्धतीने देखील जमिनीचे दर ठरवताना हीच परिमाणे लक्षात घेतली जातात. परंतू 1 एकर म्हणजे नक्की किती जमीन हे बऱ्याच जणांना माहिती नसते. त्यासाठी आपण पुढील माहिती दिली आहे. ती नीट समजून घ्या आणि तुमच्या शेतजमिन किंवा बिगर शेतजमीन असेल तरी जमिनीचे मोजणी करुन घ्या.

● 1 गुंठा म्हणजे किती 1089 चौरस फूट

● 33 फूट x 33 फूट – 1089 चौरस फूट

● 1 एकर म्हणजे 40 गुंठे

● 1 हेक्टर 100 गुंठे

● 1 हेक्टर म्हणजे 2.47 एकर

● 1 चौ.मी. म्हणजे 10.76 चौ. फु

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!