Mahila Bachat Gat Loan Scheme : महिला बचत गट कर्ज योजना! सरकार या महिलांना देत आहे 5 ते 20 लाखांचे कर्ज; पहा आवश्यक कागदपत्रे व अर्ज प्रक्रिया..

Mahila Bachat Gat Loan Scheme : नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात शासनाच्या माध्यमातून आता विविध योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. नागरिकांचा जास्तीत जास्त विकास करणे हे ध्येय बाळगून प्रशासन नेहमीच विविध योजना राबवत आले आहेत. राज्यामधील तरुण वर्ग तसेच बेरोजगार वर्ग यांना व्यवसाय उभारणीसाठी किंवा रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे (Mahila Bachat Gat Loan Scheme). शासनांतर्गत विविध योजनांची अंमलबजावणी करून सर्वसामान्य नागरिकांना अनुदान देऊन त्यांचा आर्थिक तसेच सामाजिक दृष्ट्या विकास करणे हा महत्त्वाचा उद्देश आहे.

Mahila Bachat Gat Loan Scheme
Mahila Bachat Gat Loan Scheme

Mahila Bachat Gat Loan Scheme

राज्यभरातील सुशिक्षित तसेच रोजगाराच्या शोधामध्ये असलेल्या महिलांना आता रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी व त्यांना आर्थिक सहाय्यता करण्यासाठी प्रशासनाच्या अंतर्गत एक नवीन योजना राबवली जात आहे. ती योजना म्हणजे महिला बचत गट योजना (Mahila Bachat Gat Loan Scheme). या योजनेच्या माध्यमातून महिलांना प्रशासन स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देत आहे. राज्यामधील जास्तीत जास्त महिला या अधिसूशिक्षित आहेत व पुरेसे भांडवल त्यांच्याकडे नाही त्यामुळे त्या असा व्यवसाय सुरू करू शकत नाहीत.अशा कष्टाळू आणि इच्छुक महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्यांना स्वतःचे भांडवल उभे करण्यासाठी या योजनेची सुरुवात केली गेली आहे.

अलीकडे समाजाचा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा तितक्या प्रमाणात चांगला राहिला आहे, असे सांगता येणार नाही यामुळे बहुतांश बँका तसेच विविध पुरवठा करणाऱ्या संस्था या महिलांकरिता कर्ज उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ करत असतात. अशावेळी त्यांचे स्वतःचे उद्योग सुरू करण्याचे स्वप्न हे अपुरे राहते यासाठीच प्रशासनाने सामाजिक न्याय तसेच विशेष सहाय्य विभाग अंतर्गत महिला बचत गट योजना राबवली आहे.

सरकारच्या Mahila Bachat Gat Loan Scheme या योजनेअंतर्गत महिलांना उद्योग व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी तसेच चालना देण्यासाठी कमी व्याजदरांमध्ये काही नियमांच्या व शर्तींच्या अंतर्गत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. या माध्यमातूनच आता स्वतःचा व्यवसाय महिला सुद्धा उभा करू शकतील यामुळे त्यांचा स्वतःचा आर्थिक दृष्ट्या चांगला विकास होईल आणि इतरांना रोजगार सुद्धा मिळेल आणि हेच प्रशासनाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.

महिला बचत गट शासकीय योजनेची उद्दिष्ट्ये

 • काही अश्या सुशिक्षित महिला आहे की ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, अशा महिलांना व्यवसाय उभारण्यासाठी भांडवल उपलब्ध करून देणे.
 • Mahila Bachat Gat Loan Scheme या योजनेअंतर्गत महिलांचा सामाजिक तसेच आर्थिक दृष्ट्या विकास करणे.
 • राज्यामध्ये वाढत जाणाऱ्या बेरोजगारीचे पूर्णपणे प्रमाण कमी करणे व महिलांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देणे.
 • महिला बचत गट योजनेअंतर्गत राज्यामधील महिलांच्या जीवनमानाचा दर्जा चांगल्या प्रकारे उंचावणे, हा सरकारचा प्रमुख उद्देश आहे.

महिला बचत गट शासकीय योजनेचे लाभार्थी-

महाराष्ट्र राज्य मधील जे काही बचत गट असतील त्या सर्व बचत गटामधील महिला सदस्य आहेत. त्या महिला या योजनेसाठी पात्र असतील.

महिला बचत गट शासकीय योजने अंतर्गत दिले जाणारे कर्ज व व्याजदर

राज्यामधील ज्या महिला ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांना शासनाच्या माध्यमातून पाच लाखांपासून वीस लाखांपर्यंतचे कर्ज पुरवले जात आहे. विविध बचत गटांसाठी देण्यात आलेल्या कर्जा करिता चार टक्के व्याजदर प्रशासनाच्या माध्यमातून निश्चित केले आहे.

Mahila Bachat Gat Loan Scheme
Mahila Bachat Gat Loan Scheme

महिला बचत गट योजना आवश्यक कागदपत्रे-

 • आधार कार्ड-
 • रेशन कार्ड-
 • मतदान ओळखपत्र –
 • बँक पासबुक-
 • उत्पन्नाचा दाखला-
 • रहिवासी दाखला-
 • मोबाईल नंबर-
 • ईमेल आयडी-
 • पासपोर्ट साईज फोटो

महिला बचत गट योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत-

 • प्रथम आपल्याला आपल्या जवळ असलेल्या जिल्हा कार्यालयामधील सामाजिक न्याय व विशेष विभागामध्ये जायचे आहे आणि तेथे जाऊन या योजनेची माहिती मिळवायचे आहे.
 • तिथून तुम्हाला अर्ज देखील भेटेल अथवा पुढील लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अर्ज चा फॉर्म पीडीएफ च्या स्वरूपात भेटेल त्याची प्रिंट काढून घ्यावी.
 • त्या अर्जामध्ये जी काही माहिती विचारलेली आहे ती योग्य व अचूक भरावी.
 • अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती बरोबर आहे का याची एकदा पडताळणी करावी.
 • त्यानंतर आपल्याला अर्जासोबत जी काही आवश्यक कागदपत्रे असतील त्यांची सत्यप्रत करायचे आहेत आणि ती जोडायचे आहेत.
 • त्यानंतर तो अर्ज कार्यालयामध्ये जमा करायचा आहे.
 • एकदा अर्ज जमा केल्यानंतर तुमच्या अर्जाची पोचपावती घ्यायचे आहे.
 • अशाप्रकारे तुमच्या अर्जाची ऑफलाइन प्रक्रिया पूर्ण होईल.

महिला बचत गट योजना शासकीय अधिकृत वेबसाईट –https://maharashtra.gov.in/Site/1604/scheme

महिला बचत गट योजना FORM-https://drive.google.com/file/d/1SQgY5xGEUy8JejG2fRhASyC4vDrwssbX/view?pli=1

Similar Posts