PM KUSUM Scheme: ‘पीएम कुसुम योजने’चा लाभ घेण्यात महाराष्ट्र अव्वल! कुसुम सौरपंप योजनेचा 72 हजार शेतकऱ्यांनी घेतला लाभ..

PM KUSUM Scheme: ग्रामीण भागामध्ये विज भारनियमनाची समस्या अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्यामुळे शेती करण्यासाठी अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळेच तर राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य होण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेतीच्या वापरासाठी पारेषण विरहित पिएम सौर कृषी पंप उपलब्ध करून देण्यासाठी ‘पीएम कुसुम योजना’ राबविण्यात येत आहे.

PM KUSUM Scheme

(Latest Marathi News) ‘पीएम कुसुम योजनेच्या (PM KUSUM Scheme) अंमलबजावणी करण्यात महाराष्ट्र राज्याने संपूर्ण भारत देशात आघाडी घेतलेली असून आतापर्यंत जवळपास ७२ हजार शेतकऱ्यांनी कुसुम सौर पंप योजनेचा लाभ घेतलेला आहे.

कुसुम सोलार योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा.

केंद्र सरकारच्या नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय तर्फे ‘किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाभियान’ (ज्याचा शॉर्ट फ्रॉम ‘कुसुम’ असा आहे) ही योजना २०१९-२०२३ या कालावधी दरम्यान राबवीत असून या योजनेमध्ये राज्यांना ९ लाख ४६ हजार ४७१ कुसुम सौरपंप बसविण्याकरिताची मान्यता देण्यात आली आहे. यापैकी भारतात २ लक्ष ७२ हजार ९१६ सौर पंप स्थापित सुद्धा झालेले असून यात महाऊर्जामार्फत सर्वाधिक सौर कृषिपंप आपल्या राज्यात म्हणजेच महाराष्ट्रामध्ये बसविण्यात आले आहेत. (PM KUSUM Scheme)

‘पीएम कुसुम योजने’च्या अंमलबजावणीकरिता महाऊर्जातरफ एक स्वतंत्र पोर्टल विकसित करण्यात आले असून त्यासाठी शेतकऱ्यांकडून ऑनलाइन अर्ज करण्यापासून ते कागदपत्रे अपलोड करणे, कागदपत्रांची छाननी करणे, शेतकऱ्यांना लाभार्थीचा हिस्सा भरण्यासाठी संदेश पाठविणे, लाभार्थ्यांना त्यांचं हिस्सा ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध करून देणे, याबरोबरच शेतकऱ्यांना पुरवठादार निवडण्याची मुभा देण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांनी पुरवठादारची निवड केल्यानंतर सौर पंपाची स्थापित करून त्याची आरएमएस (RMS) प्रणालीद्वारे माहिती घे

राज्यात नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयातर्फे महाराष्ट्र राज्यातील महाऊर्जास २ लाख २५ हजार कुसुम सौर पंप आस्थापना करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. त्यापैकी राज्य सरकारने महावितरण कंपनीला त्यांच्याजवळ असलेली पेड पेंडींगच्या पुढील तब्बल १ लाख सौर पंप आस्थापना करण्यासाठी मान्यता दिलेली आहे. त्यामुळेच तर महावितरणकडे कृषिपंप जोडणीकरिता अर्ज केलेल्या पण अनामत रक्कम (डिपॉझिट) न भरलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा आता सौर कृषिपंपाची स्थापना करून देण्यात येणार आहे.

भारतातल्या सर्व योजनांची संपूर्ण यादी पाहण्यासाठी क्लिक करा.

महाऊर्जाकडे उरलेल्या १ लाख २५ हजार सौर पंपाच्या उद्दिष्टाला अनुसरून राज्यामध्ये शेतकऱ्यांनी केलेले ८ लाख ७४ हजार ९७ अर्ज प्राप्त झालेले असून त्यापैकी १ लाख ४ हजार ८२३ जणांना मान्यता देण्यात आलेली आहे. तर त्यापैकी ९४९१९ शेतकरयांना ‘संदेश’ सुद्धा पाठविण्यात आलेले आहेत.

तर ८३,४८० शेतकऱ्यांनी त्यांचा लाभार्थी हिस्सा भरलेला असून त्यातील ७१,९५८ कुसुम सौर पंप स्थापित सुद्धा झलेले आहेत. त्यामुळेच तर महाऊर्जाने ११ सप्टेंबर रोजी केंद्र सरकारकडे पुढच्या १,८०,००० हजार सौरपंपांच्या उद्दिष्ट पूर्ण करण्याची मागणी सुद्धा केली आहे. PM KUSUM Scheme

PM KUSUM Scheme सौरपंपांसाठी मिळतंय ९० टक्के अनुदान..

कुसुम योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना ९०% अनुदान देण्यात येत असून यामध्ये सर्वसाधारण घटकाकरिता केंद्र ३० टक्के, राज्य १० टक्के, लाभार्थी १० टक्के, टोसे ५० टक्के हिस्सा तर अनुसूचित जाती/जमातींसाठी लाभार्थी हिस्सा ५ टक्के, केंद्र सरकार हिस्सा ३० टक्के तसेच राज्य सरकार ६५ टक्के हिस्सा देणार आहे.

कुसुम योजनेची राज्यनिहाय सद्यःस्थिती

राज्य एकूण मंजूर स्थापित सौर पंप

महाराष्ट्र- २ लाख २५ हजार ७१ हजार ९५८

हरियाना – २ लाख ५२ हजार ६५५ ६४ हजार ९१९

राजस्थान – १ लाख ९८ हजार ८८४ ५९ हजार ७३२

उत्तरप्रदेश– ६६ हजार ८४२ ३१ हजार ७५२

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!