Kusum Solar Pump Yojana 2023 | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! कुसुम योजनेचा दुसरा टप्पा.. 2 लाख सोलर पंपासाठी अर्ज सुरू..
Kusum Solar Pump Yojana 2023: राज्यातील वीज वितरणाची शेतातील लाईट फार कमी वेळ असते. शेतकऱ्यांना यामुळे सर्वांत मोठा तोटा होतो. कारण लाईट नसल्यामुळे सगळ्याच गोष्टी खोळंबून गेल्या आहेत. लाईट नसल्याने शेतातील पिकांना पाणी देता येत नाही. यासाठी रसरकारने खास योजना सुरू केलेली आहे. ज्यामुळे शेतकरी बांधव विजेच्या झंझटीतून मुक्त होऊ शकतात.
‘महाकृषी ऊर्जा अभियान’ अंतर्गत असणारी एक योजना जिचे नाव प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप.. या योजनेचा दुसरा टप्पा सुरू झालेला आहे. या योजनेच्या माध्यमातून सौर कृषीपंपांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. महाऊर्जाच्या वतीने शेतकरी बांधवाना असे आवाहन करण्यात आले आहे की, सौर कृषीपंपांसाठी ऑनलाईन अर्ज करावेत. ‘PM Kusum Yojana’
हे अभियान घटक महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) मार्फत अर्जदारांचे ऑनलाईन अर्ज मागवून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर सौरपंप येणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी महाऊर्जाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ‘PM Kusum Solar Pump Yojana’
Kusum Solar Pump Yojana कुसुम सोलर पंप योजना दुसरा टप्पा..
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
राज्य सरकारने जाहीर केलेल्या ऊर्जा धोरण 2020 च्या नुसार, शेतीला दैनंदिन वीज पुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या दृष्टीने ही योजना शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. या योजनेअंतर्गत पुढील पाच वर्षांसाठी वार्षिक एक लाख दराने 5 लाख सौर कृषी पंप दिल्या जातील. (pm kusum yojana maharashtra online registration)
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सौरऊर्जा पंप जोडणीस मान्यता दिली असून राज्य सरकारने एक लाख सौर पंपांच्या जोडणीसाठी 1969.50 कोटी निधी मंजूर केला आहे. यापैकी 30 टक्के म्हणजेच 585 कोटी रुपये केंद्र सरकार, तर राज्य सरकार 1211 कोटी रुपये देणार आहे.
pm kusum solar yojana तसेच पुढील 5 वर्षांसाठी 436 कोटी रुपये बजेट वाटप आणि 775 कोटी रुपयांच्या अतिरिक्त वीज विक्री कराच्या माध्यमातून निधी उभारण्यास मान्यता देण्यात येईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे.
pm kusum yojana maharashtra शेतकरी किती क्षमतेच्या सौर कृषीपंपांसाठी अर्ज करू शकता? राज्यातील शेतकऱ्यांना 3 एच.पी., 5 एच.पी. व 7.5 एच.पी. क्षमतेच्या सौर कृषीपंपांसाठी अर्ज करता येतील. (Kusum Solar Pump Yojana Online Application)
Kusum Solar Pump Yojana आवश्यक कागदपत्रे
- सातबारा उतारा
- आधार कार्ड
- बॅंक पासबुक
- पासपोर्ट साइज फोटो
- शेत जमीन / विहिर / पाण्याचा पंप सामाईक असल्यास इतर भागीदाराचे ना हरकत प्रतिज्ञापत्र (kusum solar pump yojana maharashtra 2023 online apply)
योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज..
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
सर्वप्रथम या योजनेच्या https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B या अधिकृत वेबसाईटवर जा.
यानंतर, तुम्हाला होमपेजवर ‘तुमचा नोंदणी’ पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
आता तुमच्यासमोर अर्ज ओपन होईल. अर्जामध्ये तुमचे नाव, पत्ता, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक अशी माहिती विचारली जाईल.
ही माहिती भरल्यानंतर, ‘सबमिट’ बटणावर क्लिक करा.
हे देखील वाचा-
- शेतकऱ्यांनो शेततळ्यासाठी 100 टक्के अनुदान, असा घ्या योजनेचा लाभ
- शेतकऱ्यांना ‘या’ तारखेला नुकसान भरपाई मिळणार, 3600 कोटी निधी मंजूर.
- कुसुम योजनेअंतर्गत सोलर पॅनल बसून लाखोंची कमाई करा