Shet Tale Yojana 2022 | शेतकऱ्यांनो शेततळ्यासाठी 100 टक्के अनुदान, असा घ्या योजनेचा लाभ

Shet Tale Yojana 2022

Shettale Yojana 2022 Maharashtra: अनेकवेळी असे होते की, पाऊस पडत नाही आणि पिकांना पाण्याची गरज असते. अशावेळी पाण्याची साठवणूक आवश्यक असते. पाणी साठवण्याचे स्त्रोत्र विहिरीचं नाही, तर शेततळे पाणी साठवण्यासाठी उत्तम पर्याय आहे. परंतु, शेततळ्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च लागतो. अनेक शेतकऱ्यांना हा खर्च परवडत नाही.

देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे व पाण्याची बचत होऊन पाण्याचा वापर कमी प्रमाणात करून चांगले पीक काढावे जेणेकरून शेतीचा आणि शेतकऱ्यांचा दोन्हींचा विकास व्हावा या उद्देशाने सरकार विविध योजना राबवित आहे. (Shet Tale Yojana Maharashtra)

शेततळे हा पाणी साठविण्यासाठी उत्तम स्त्रोत आहे. यासाठी खर्चाचा विचार केला, तर खर्च खूप जास्त प्रमाणात लागतो. परंतु, शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही.या समस्येवर उपाय म्हणून शासनाने एकात्मिक फलोत्पादन अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अनुदानाची सोय केली आहे. या योजनेची सविस्तर माहिती जाणून घेऊ या..

Shet Tale Yojana 2022 शेततळ्यासाठी 100 टक्के अनुदान


एकात्मिक फलोत्पादन अभियानाच्या माध्यमातून सामूहिक शेततळ्यासाठी 100 टक्के तर वैयक्तिक शेततळ्यासाठी 50 टक्के अनुदान या योजनेअंतर्गत दिल्या जाते. राज्यातील सर्व शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.

मुख्यमंत्री कृषी शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळ्यासाठी जास्तीत 75 हजार रुपयांपर्यंत पर्यंत अनुदान दिल्या जाते. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही दुसरी अतिशय फायदेशीर योजना आहे. या योजनेचे सामूहिक शेततळे आहे. ‘Mukhyamantri Shashwat Krushi Sinchan Yojana’

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या गटासाठी एकात्मिक फलोत्पादन मार्फत 100 टक्के अनुदान दिल्या जाते. परंतु, योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचा गट असणं आवश्यक आहे. तसेच तुमच्या गटाची नोंदणी करणे देखील गरजेचे आहे.

Shet Tale Yojana 2022 योजनेच्या अटी

खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन अर्ज करून शकता.

click here abdnews


या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी असणं आवश्यक आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचा गट असणे गरजेचे आहे. हा गट दोन किंवा दोनपेक्षा जास्त शेतकऱ्यांचा गट असायला हवा.
तसेच शेतकरी हा वेगवेगळ्या कुटूंबातील असावा.
गटामध्ये असणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांकडे सातबारा उतारा असणं आवश्यक आहे.
या शेततळ्यातील पाण्याचा वापर तुम्हाला ठिबक व तुषार सिंचनाद्वारे करावा लागेल. याबाबत तुम्हाला हमीपत्र द्यावे लागेल.

  • आवश्यक कागदपत्रे
  • आधार कार्ड
  • सातबारा उतारा
  • जातीचे प्रमाणपत्र

या शेतकऱ्यांना मिळणार योजनेचा लाभ.. येथे करा अर्ज..


तुम्ही जर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत विचार केला, तर यामध्ये 15 जिल्हे असून या सोबत विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली या 5 जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. (Shet Tale Anudan Mahiti)

तसेच कोकणातील पालघर, रायगड, ठाणे, आणि सिंधुदुर्ग तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सातारा व सांगली जिल्ह्यातील सर्व शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.

खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन अर्ज करून शकता.

click here abdnews

हे देखील वाचा-

घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
योजना सौर पॅनेल बसवा आणि २५ वर्ष मोफत वीज मिळवा.
1 KW सोलर लावायला काय खर्च येईल? त्यावर काय काय चालू शकते??

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!