महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद शापित आहे का..? केवळ ‘याच’ मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केला त्यांचा 5 वर्षांचा कार्यकाळ..

सध्या राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे त्यामुळे साहजिकच महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद शापित आहे का? असा प्रश्न उपस्थित निर्माण होत आहे. कारण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या पूर्ण इतिहासामध्ये फक्त दोनच मुख्यमंत्र्यांनी आपला 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा कार्यकाळ जाणून घ्या सविस्तर माहिती.

महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री पदाच्या इतिहासामध्ये सर्वप्रथम वसंतराव नाईक यांनी आपला 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला होता. तत्कालीन मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांच्या निधनानंतर वसंतराव नाईक यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची जवाबदारी आली होती. त्यानंतर त्यांनी 1963 ते 1975 पर्यंत म्हणजे सर्वाधिक 11 वर्षे 77 दिवस मुख्यमंत्री म्हणून राज्याचे काम पाहिलं.

वसंतराव नाईक नंतर भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेला आहे. आजपर्यंत फक्त या दोनच जणांनी आपला मुख्यमंत्री पदाचा संपूर्ण 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेला आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यांचा कार्यकाळ पुढीप्रमाणे :

▪️यशवंतराव चव्हाण – १९६० ते ६२
▪️मारोतराव कन्नमवार – १९६२ ते ६३
▪️वसंतराव नाईक – १९६३ ते १९७५
▪️शंकरराव चव्हाण – १९७५ ते १९७७
▪️वसंत दादा पाटील – १९७७ ते१९७८
▪️शरद पवार – १९७८ ते १९८०

▪️अब्दुल रहमान अंतुले – १९८० ते १९८२
▪️बाबासाहेब भोसले- १९८२ ते १९८३
▪️वसंत दादा पाटील – १९८३ ते १९८५
▪️शिवाजीराव निलंगेकर पाटील – १९८५ ते १९८६
▪️शंकरराव चव्हाण – १९८६ ते १९८८
▪️शरद पवार – १९८८ ते १९९१
▪️सुधाकरराव नाईक – १९९१ ते १९९३
▪️शरद पवार – १९९३ ते १९९५

▪️मनोहर जोशी – १९९५ ते १९९९
▪️नारायण राणे – १९९९ ते १९९९
▪️विलासराव देशमुख – १९९९ ते २००३
▪️सुशीलकुमार शिंदे – २००३ ते २००४
▪️विलासराव देशमुख – २००४ ते २००८
▪️अशोक चव्हाण – २००८ ते २०१०
▪️पृथ्वीराज चव्हाण – २०१० ते २०१४
▪️देवेन्द्र फडणवीस – २०१४ ते २०१९
▪️उद्धव ठाकरे – २०१९ ते आजपर्यंत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!