🚍 राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत देवदर्शन, सरकारी बसमधून होणार प्रवास..

👴🏻 महाराष्ट्रातील जेष्ठ नागरिकांना एसटीत प्रवास करताना करताना त्यांच्याकडून कसल्याही प्रकारचे प्रवास-भाडे न घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही महिन्यांपूर्वी घेतल्यानंतर आता राज्यातील जेष्ठ नागरिकांना राज्य सरकारकडून देव-दर्शनाची मोफत सुविधा देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. एस-टी महामंडळामार्फत ज्येष्ठ नागरिकांना महत्त्वाच्या तिर्थक्षेत्रांना भेटी देण्यात येणार असल्याचा मेगा प्लॅन तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत.

🆓 प्रत्येक महिन्याच्या शनिवार आणि रविवारी राज्यातील जेष्ठ नागरिकांना राज्य सरकारकडून देवदर्शन घडवण्यात येणार असून त्यासाठी महामंडळानं 2000 बसेस उपलब्ध करून देण्याची तयारी सुद्धा दाखवली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातील तिर्थस्थळांना भेटी देण्यासाठी जेष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची व्यवस्था करण्यात येणार असून तसा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत.

🛕 या तिर्थक्षेत्रांचा समावेश..
राज्यातील महत्त्वाची तिर्थक्षेत्र असणारे देवस्थाने या मोफत प्रवासात असणार आहेत. त्यात प्रामुख्याने पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट, अष्टविनायक दर्शन, शिर्डी, शेगाव, कोल्हापूर -जोतिबा दर्शन या तीर्थस्थळांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी असणाऱ्या धर्मशाळा, यात्री निवास येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव खोल्या देखील ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!