आमदार हरिभाऊ बागडे नानांची बाईक रॅली; तरुणांना लाजवणारा उत्साह.

भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिननिमित्त औरंगाबाद मधील भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार हरिभाऊ बागडे (नाना) यांनी बाईक रॅली काढली.

आमदार हरिभाऊ बागडेंच्या (नानांच्या) बाईक रॅलीचा हा व्हिडिओ सध्या औरंगाबादमध्ये मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. त्याचं कारणही म्हणजे 78 वर्षे वय असलेले नानांनी धोतरधारी वेशात बाईकची सवारी केलीय. एवढंच नाही तर बाइक चालवताना धोतर सावरत त्यांनी भारतीय जनता पार्टीची घोषणाबाजी सुद्धा केली आहे. त्यांचा हा उत्साह पाहून तरुण कार्यकर्ते सुद्धा आश्चर्यचकित झाले.

आमदार हरिभाऊ बागडे (नाना) यांच्या नेतृत्वाखाली शेंद्रा पासुन करमाड येथील हनुमान मंदिरापर्यंत या बाइक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नानांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आवाहन बागडे यांनी केले.

या बाईक रॅलीमध्ये भाजपा तालुकाध्यक्ष श्रीराम शेळके, माजी सभापती राधाकिसन पठाडे, सजनराव मते, सजन बागल, माजी सरपंच दत्तात्रय उकर्डे, साहेबराव दिघोळे, राधाकिसन भोसले, सहभागी होते.

Similar Posts