संभाजीनगरात सैराटची पुनरावृत्ती, प्रेमसंबंधातून दोन सख्या भावांनी केली बहिणीची हत्या..

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पुन्हा एकदा सैराटची (Sairat) सिनेमाची पुनरावृत्ती पाहायला मिळाली असून, बहिणीचे प्रेमसंबंध असल्यावरून दोन भावांनी सख्या बहिणीची कुऱ्हाडीने हत्या (Murder) केयाची संतापजनक घटना छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यातील राक्षा शिवारात समोर आली आहे. या हत्याप्रकरणी फर्दापूर पोलीस ठाण्यामध्ये 4 जणांच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंद दाखल करण्यात आला आहे.

चंद्रकला धोडिंबा बावस्कर (Chandrakala Bavaskar) वय 35 वर्षे, रा. तोंडापूर, ता. जामनेर असे मृत महिलेचं नाव, तर मृत महिलेचा भाऊ कृष्णा धोडिंबा बावस्कर व शिवाजी धोडिंबा बावस्कर, महिलेचे वडील धोडिंबा सांडू बावस्कर आणि आई शेवंताबाई धोडिंबा बावस्कर असे आरोपींचे नाव आहे..

प्राप्त माहितीनुसार, मयत चंद्रकला बावस्कर हीचे प्रेमसंबंध असल्याचा संशय तिचे आई-वडील आणि भावांना होता, या संशयावरून या चौघांनी तिला संपविण्याचा निर्णय घेतला. शनिवारी सकाळी राक्षा शिवारात शेतकरी शमीम शाह कासम शाह वय 30 वर्षे, रा. तोंडापूर, ता. जामनेर हे आपल्या शेतात काम करत असताना तिथे अचानक चंद्रकला बावस्कर धावत आल्या. घाबरलेल्या अवस्थेत चंद्रकलाने ‘माझे दोघे भाऊ आणि आई-वडील प्रेमसंबंधांच्या कारणावरून मला ठार करणार आहे. त्यामुळे, मला वाचवा, कोठे तरी लपवा, असे म्हटले. शमीम यांनी तिला त्यांच्या बकऱ्याच्या शेडमध्ये लपण्यास सांगितले.

काही वेळातच तिथे चंद्रकलाचे दोन्ही भाऊ कृष्णा धोडिंबा बावस्कर व शिवाजी धोडिंबा बावस्कर हे दोघे हातात कुऱ्हाड घेऊन तिथे धावतच आले. त्यांनी शेडमध्ये पाहणी करून अखेर चंद्रकला यांचा शोध घेऊन मारहाण सुरु केली. तसेच हातात असलेल्या कुऱ्हाडीने चंद्रकलेच्या डोक्यात घाव घातले. घाव वर्मी बसल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. याचवेळी तिथे तिचे आई-वडिल देखील आले. त्या दोघांनी शमीम याना मारहाण करत दोन्ही मुलांना चंद्रकलाला जिवंत ठेऊ नका असे सांगितले, शमीमने कशीबशी त्यांच्या तावडीतून सुटून थेट पोलीस ठाण्यात पोहचले.

बावस्करच्या तावडीतून सुटलेले शाह कासम शाह यांनी थेट पहूर पोलिस ठाण्यात गाठून पोलिसांना पोलिसांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. मात्र, घटनास्थळ फर्दापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असल्याने पहूर पोलिसांनी तत्काळ घटनेची माहिती फर्दापूर पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच, फर्दापूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक भरत मोरे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सोयगाव ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला

Similar Posts