मद्यप्रेमींसाठी महत्वाची बातमी..! राज्यात किराणा दुकानांमधून वाईन विक्री करायची की नाही हे जनता ठरवणार ?..!

राज्यातील मद्यप्रेमींसाठी एक महत्वाची बातमी आहे.. मद्याचे दुकान शोधताना मद्यप्रेमींची ‘वणवण’ होऊ नये, यासाठी ठाकरे सरकार तर्फे काही दिवसापूर्वीच एक मोठा निर्णय घेतला होता. आणि तो म्हणजे, महाराष्ट्रातील किराणा दुकाने आणि सुपर मार्केटमध्ये ‘वाईन’ विक्रीला सरकारने परवानगी देण्यात आली होती, आणि विशेष म्हणजे शेतकरी हितासाठी हा निर्णय घेतल्याचं सरकारचं म्हणणं होतं..

दरम्यान, राज्य सरकारच्या या निर्णयाने एकच गोंधळ उडाला होता. विरोधकांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. किराणा दुकानातून सहज वाईन मिळू लागल्यामुळे सर्वसामान्यांची मुले व्यसनाधिन बनतील. त्यामुळे महसूल वाढीसाठी सरकारने घेतलेला हा निर्णय सर्वथा चुकीचा असल्याचे सांगत सामाजिक संघटना रस्त्यावर उतरल्या होत्या.

तसेच नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सुध्दा या निर्णयाचे पडसाद उमटले.. विरोधी पक्षां-सह सामाजिक संघटनांचा विरोध लक्षात घेता राज्य सरकारने हा निर्णय तूर्तास राबवणार नसून या निर्णयाबाबत एक मोठा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे..

वाईन विक्रीच्या निर्णयाबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाने 29 जूनपर्यंत नागरिकांकडून हरकती व सूचना मागवल्या आहेत. त्यासाठी राज्य सरकारने स्वतंत्र ‘ई-मेल’ उपलब्ध करून दिलाय. तसेच टपालाद्वारेही जनतेला हरकती नोंदवता येणार आहेत. त्यासाठी सरकारने पत्ता दिला आहे.. तो खालीलप्रमाणे –

📧 ई-मेल : [email protected]

📍पत्ता : आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क विभाग, दुसरा मजला, जुने जकात घर, शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट मुंबई 400023.

ई-मेलद्वारे किंवा टपालद्वारे वरील पत्त्यावर पत्र पाठवून नागरिकांनी वाईन विक्रीच्या निर्णयाबद्दल 29 जूनपर्यंत हरकती व सूचना दाखल करून आपली मतं मांडावीत, असं आवाहन उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांनी केलंय..

नागरिकांकडून मिळणाऱ्या हरकती व सूचना विचारात घेऊनच किराणा दुकानात वाईन विक्रीबाबत ठरवले जाणार आहे.. जनतेचं मत पाहूनच नव्या नियमावलीच्या नियमांचा प्रारूप आराखडा आधी प्रसिद्ध केला जाईल. त्यानंतरच या संदर्भातील अंतिम निर्णय होईल, असं सांगण्यात आलं..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!