औरंगाबादेत पुन्हा राडा; कोकणवाडी परिसरात तुफान हाणामारी. व्हिडिओ समोर..
औरंगाबाद शहरामधील कोकणवाडी परिसरामध्ये दोन गटांमध्ये जबरदस्त मरामारी झाल्याची घटना समोर आलीय.
मारमारीच्या घटनेचे CCTV फुटेज मध्ये 15 ते 20 जणामध्ये ही हाणामारी झाल्याचे दिसत आहे. यामध्ये 7 ते 8 तरूण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली असून जखमींवर उपचार सुरु आहेत.
ही घटना काल बुधवारी रात्री 11:30 वाजेच्या सुमारास झाली असून DJ लावण्यावरून दोन गट आपापसात भिडले. क्षुल्लक वादाचे रुपांतर हाणामारीत झाले.
काल रात्री घडलेल्या या घटनेमुळे रस्त्यावरील वाहतूक खोळंबली होती.