गुडलक की बॅडलक? जाणून घ्या, जन्मखूणा काय सांगतात…

Birthmark : भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये विविध मान्यता दडलेल्या असतात. माणवाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत अश्या अनेक गोष्टी असतात की, ज्या मागे काही ना काही अर्थ दडलेला असतो किंवा ते संकेत असतात. ज्योतिषशास्त्राच्या साहाय्याने अशा काही संकेतांची फोड करून काही ना काही तर्क लावले जाऊ शकतात, एखाद्या व्यक्तीच्या जन्म घेण्यावरूनही बऱ्याच मान्यता असतात. शरीरवर असलेली जन्मखूण शुभ असते आणि अशुभसुद्धा. शरीराच्या कोणत्या अवयवावर जन्मखूण आहे, यावरूनसुद्धा काही तर्क लावले जातात. चला तर मग जाणून घेऊया जन्मखुणेविषयीच्या काही धार्मिक मान्यता…

समुद्रशास्त्रानुसार, ज्या व्यक्तींच्या बोटांवर जन्मखूण आहे, ती व्यक्ती स्वतंत्र विचार करणारी आणि स्वावलंबी असते. ज्या व्यक्तींच्या नाकावर जन्मखूण आहे, ती व्यक्ती सृजनशील, सर्जनशील असते. अशा व्यक्तींचे विचार एकदमचा हटके असतात. ज्या व्यक्तींच्या पाठीवर जन्मखूण असते, अशा व्यक्ती अत्यंत प्रामाणिक आणि खुल्या विचाराच्या असतात. हाती घेतलेले काम त्या मेहनतीने पूर्ण करतात.

समुद्रशास्त्रानुसार, ज्या व्यक्तीच्या पोटावर चिन्ह असते, त्याचा अर्थ असा होतो की तो खूप लोभी आणि स्वार्थी असेल. अशा लोकांच्या मित्रांची संख्याही कमी असते कारण हे लोक आधी स्वतःचा विचार करतात. ज्या लोकांच्या उजव्या गालावर जन्मचिन्ह असते, असे लोक खूप मेहनती असतात. या लोकांचे वैवाहिक जीवनही चांगले असते. दुसरीकडे, डाव्या गालावर चिन्ह असल्यास, व्यक्तीला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. असे लोक खूप संवेदनशील देखील असतात.

कपाळाच्या मध्यभागी जन्मखूण असणे एखाद्या व्यक्तीचा प्रेमळ स्वभाव दर्शवते. असे लोक नेहमी प्रेमरसात मग्न असतात. कपाळाच्या उजव्या बाजूला जन्मखूण असणे ही व्यक्ती बुद्धिमान असल्याचे दर्शवते. त्याचबरोबर कपाळाच्या डाव्या बाजूला असलेल्या जन्मखूणमुळे व्यक्तीकडे पैसा नसतो आणि असे लोक खार्चिक स्वभावाचे असतात.

ज्या लोकांच्या बोटावर जन्मचिन्ह असते, असे लोक स्वतंत्र असतात आणि कधीही कोणावर अवलंबून नसतात. नाकावर बर्थमार्क असलेले लोक खूप सर्जनशील असतात. ज्या लोकांच्या पाठीवर खूण असते ते खूप प्रामाणिक मानले जातात. असे लोक आपल्या मेहनतीने सर्व काम पूर्ण करतात.

डाव्या खांद्यावर जन्मचिन्ह असणे अशुभ मानले जाते. असे लोक आयुष्यभर संकटात राहतात. उजव्या खांद्यावर चिन्ह असण्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला नशीब चांगले असेल. पायावर किंवा मांडीवर जन्मखूण असणे हे शुभ लक्षण आहे. असे लोक प्रामाणिक असतात. त्यांना जीवनात खूप प्रगती मिळते. पायाच्या तळव्यावर जन्मखूण असल्यास व्यक्तीला परदेशात नोकरी मिळण्याची शक्यता असते.

हनुवटीवर जन्मखूण असेल तर अशा लोकांचा स्वभाव अतिशय साधा असतो. त्यांच्यामध्ये नेहमी परोपकाराची भावना असते. तसेच ज्यांच्या छातीवर जन्मचिन्ह असते, असे लोक अतिशय आनंदी स्वभावाचे असतात आणि ते कोणत्याही कामात यश मिळवतात. जर एखाद्या पुरुष किंवा स्त्रीच्या डाव्या स्तनाखाली जन्मखूण असेल तर त्यांना नेहमी यश मिळते आणि अशा लोकांची विनोदबुद्धी देखील चांगली असते. उजव्या स्तनाखाली जन्मखूण सूचित करते की तुम्ही धनवान व्हाल.

छातीच्या मध्यभागी जन्मचिन्ह असल्यास, असे मानले जाते की तुमचे नशीब चांगले असेल. जर डोक्यावरील जन्मखूण सूचित करते की तुमच्या आयुष्यात अनेक प्रेमसंबंध असतील. मानेवर जन्मखूण असणे ती व्यक्ती श्रीमंत असल्याचे दर्शवते.

उजवीकडील गालावर जन्मखूण असलेली व्यक्ती ही मेहनती आणि कामाबद्दल उत्कटतेचे लक्षण आहे. दुसरीकडे, डावीकडील जन्मखूण दुःख आणि त्रासांचे प्रतीक आहे.

कधी कधी व्यक्तीच्या चेहऱ्यावर जन्मखूण असते. याचा अर्थ ती व्यक्ती अतिशय भावूक व बोलकी आहे. हे लोक खूप श्रीमंत असतात आणि त्यांचे जीवन आनंदी असते. त्यांची आर्थिक परिस्थितीसुद्धा भक्कम असते.

व्यक्तीच्या पाठीवरची जन्मखून त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल सांगते, की ती व्यक्ती प्रामाणिक आणि मोकळ्या मनाची आहे. असे लोक आपले सर्व काम पूर्ण मेहनतीने आणि प्रामाणिकपणे करतात. तसेच जीवनात यश मिळवता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!