Free Tablet Yojana Maharashtra 2022 | विद्यार्थ्यांना मिळणार अभ्यासासाठी मोफत टॅबलेट

Free Tablet Yojana Maharashtra 2022: महाराष्ट्रात एकही विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी राज्य सरकारतर्फे ‘फ्री टॅबलेट योजना’ राबविली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार अकरावी, बारावीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट देत आहे.

Free Tablet Yojana Maharashtra 2022jn

अनेकदा बुद्धीमत्ता असूनही आर्थिक अडचणींमुळे काही विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता येत नाही. उच्च शिक्षणासाठी राज्यातील विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने खास योजना सुरु केली आहे. (Free Tablet for Students in Maharashtra)

राज्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, तसेच त्यांच्या भविष्याला आकार देण्यासाठी राज्य सरकारने फ्री टॅबलेट योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. या योजनेबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

फ्री टॅबलेट योजनेबाबत..Free Tablet Yojana


महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) अंतर्गत फ्री टॅबलेट योजना राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी MHT-CET/JEE/NEET – 2023 परिक्षांच्या ऑनलाईन पूर्व तयारीसाठी ही योजना सुरू केली आहे. (Mahajyoti Tablet Yojana 2022)

महाज्योतीच्या या योजनेच्या माध्यमातून 11वी मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना JEE, NEET, CET परिक्षेसाठी मोफत मार्गदर्शन करणे या योजनेचा उद्देश आहे. 10वी नंतर अनेक विद्यार्थ्यांना इंजिनिअर व मेडिकलसाठी तयारी करायची असते. परंतु, आर्थिक परिस्थितीमुळे कोचिंग क्लासेस लावणं शक्य होत नाही. यासाठी ही योजना सुरू केली आहे.

योजनेचे फायदे


Free Tablet Yojana Maharashtra या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना जेईई, नीट आणि सीईटी या परीक्षांसाठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षण दिले जाते.
तसेच या ऑनलाईन प्रशिक्षणासाठी परीक्षेची पुस्तके, मोफत टॅबलेट आणि दररोज 6 जीबी इंटरनेट डेटा देण्यात येईल. (Tablet Yojana Maharashtra)

योजनेसाठीचे निकष


उमेदवार महाराष्ट्रातील रहिवासी असावा.
या योजेनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांने यावर्षी दहावी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी आणि अकरावीसाठी विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असणे आवश्यक आहे.
ओबीसी, (OBC) भटक्या जाती-जमाती (VJNT) आणि विशेष मागास प्रवर्गातील (SBC) विद्यार्थ्यांना या योजनेसाठी पात्र असतील.
शहरी विभागात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावी परीक्षेत 70 टक्के तर ग्रामीण, आदिवासी किंवा नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना 60 टक्के गुण असणे आवश्यक आहे. (Free Tablet Yojana)

आवश्यक कागदपत्रे Free Tablet Yojana

  • दहावी गुणपत्रिका
  • अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्यासंबंधी कागदपत्रं
  • जात प्रमाणपत्र
  • नॉन क्रिमिलेयर (Tablet Yojana 2022)

असा करा अर्ज..


Free Tablet Yojana 2022 Online Registration फ्री टॅबलेट योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
यासाठी विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सरकारच्या महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे.
या वेबसाईटवर आल्यानंतर खाली येऊन MHT-CET/JEE/NEET – 2023 या परीक्षांच्या ऑनलाईन पूर्व तयारीसाठी नोंदणी खालील ‘Read More’ पर्यायावर क्लिक करा.
आता तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होईल. येथे ‘Click here for Registration’ या पर्यायावर क्लिक करा.
आता तुमच्यासमोर अर्ज ओपन होईल. अर्जामध्ये विचारलेली माहिती व्यवस्थितपणे भरून फॉर्म ‘सबमिट’ करा.
योजनेच्या लाभासाठी तुम्ही पात्र आहात का यासाठी महाज्योती कडून संपर्क केल्या जाईल.


हे देखील वाचा-


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!