यंदाचा मॉन्सून वेळेपूर्वी की वेळेनंतर? नेमका काय आहे हवामान विभागाचा अंदाज.

देशातील अनेक राज्यांमध्ये सुरू जणू काही आगच ओकत आहे. पण बंगालच्या खाडीमध्ये तयार झालेले चक्रीवादळ ‘असनी’ची तीव्रता कमी झाली आहे. त्यामुळे उकड्या पासून लवकरच दिलासा मिळू शकतो तर काही ठिकाणी पावसाचा अंदाजसुद्धा हवामान खात्याने दिला आहे.

सद्य घडीला पश्चिम किनारपट्टी ढगाळ असून वादळाचा परिणाम केरळ किनारपट्टी, गोवा, कर्नाटक, कोकण याबरोबरच मुंबई, ठाणे आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत वातावरण ढगाळ राहणार असून काही भागामध्ये वाऱ्या बरोबरच पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे

विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यामध्ये काही परिसरामध्ये गडगडाट होऊन हलक्या सरी पडतील.

आज गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, काही ठिकाणी हलका पाऊस पडणार असला तरी उद्या चंद्रपूर आणि वर्धा या जिल्ह्यांना हवामान विभागा कडून यलो अलर्ट दिला आहे. यानंतर 16 मे च्या नंतर सुद्धा राज्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

केव्हा होणार मान्सूनचे आगमन..

अंदमानच्या समुद्रावर 13 ते 19 मे मध्ये मॉन्सून धडकणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरवर्षी अंदबान मध्ये 22 मे च्या आसपास दाखल होणारा मॉन्सून यावेळेस वेळेपूर्वीच दाखल होणार आहे. तर कोकणात 27 मे ते 2 जूनपर्यंत दाखल होण्याचा अंदाज आहे. 21 मेला मॉन्सून केरळच्या किनारपट्टीवर दाखल होऊ शकतो. मग यानंतर तो पुढील काही दिवसामध्ये भारताच्या इतर भागात पसरू शकतो, असा अंदाजही या संस्थेने वर्तवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!