Petrol Pump Business Information in Marathi | पेट्रोल पंप व्यवसाय असा सुरू करा आणि दरमहा कमवा लाखों रुपये..
Petrol Pump Business Information in Marathi: देशात पेट्राेल-डिझेलच्या दरात गेल्या काही दिवसांपासून रोजच वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्याचे बजेट बिघडले आहे. आता काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारने आणि केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेल दरात कपात केली. महागाई वाढत असली, तरी त्या प्रमाणात पगार वाढत नसल्याने सामान्य नागरिकांची चिडचिड वाढली आहे.
पेट्रोल व डिझेलची महागाई वाढत असली, पण पेट्रोल पंप मालकाला यांचा काही तोटा होत नसतो. पेट्रोल व डिझेल व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतांना दिसत आहे. या व्यवसायामुळे मालकाला चांगलाच फायदा होतो. तुम्ही पेट्रोल पंप व्यवसाय करायचा विचार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. (Petrol Pump Business Maharashtra)
पेट्रोल पंप हा फायद्याचा व्यवसाय मानल्या जात आहे. भारतात पेट्रोल आणि डिझेलची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. पेट्रोल-डिझेल जर एक दिवस बंद असले, तर सारी कामे ठप्प होतात. पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी कंपन्यांकडून लायसन्स देत असतात. यासाठी कंपन्या कोणत्या क्षेत्रात पेट्रोल पंप सुरू करायचा आहे यासाठी जाहीरात दिल्या जाते.
पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी पात्रता
भारताचा नागरिक असणं गरजेचं आहे.
पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी तुमचं वय 21 ते 55 वर्षांपर्यंत असणं आवश्यक आहे.
तुम्हाला शहरात पेट्रोल पंप सुरू करायचा असेल, तर 12 वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे.
जर तुम्हाला ग्रामीण भागात पेट्रोल पंप सुरू करायचा असेल, तर 10 वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
देशात बीपीसीएल, एचपीसीएल, आयओसीएल, रिलायन्स reliance petrol pump dealership, एस्सार ऑइल hp petrol pump dealership या सारख्या सार्वजनिक आणि खासगी कंपन्यांद्वारे पेट्रोल पंप सुरू करण्याचे परवाने दिले जातात.
पेट्रोल पंप व्यवसाय सुरू करण्यासाठी किती खर्च येतो?
पेट्रोल पंप व्यवसायात चांगलाच नफा मिळत असतो. या व्यवसायात गुंतवणूक पण तशीच करावी लागते. मिळालेल्या माहितीनुसार, शहरी भागात जर पेट्रोल पंप व्यवसाय सुरू करायचा असेल, तर 30 ते 35 लाखांपर्यंत खर्च येऊ शकतो. ग्रामीण भागात सुरू करायचा असेल, तर कमीत कमी 15 लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. (Petrol Pump Business Plan)
पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी जागेची गरज.. petrol pump dealership information in marathi.
पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी तुमच्याकडे जमीन असणं आवश्यक आहे. जमीन नसेल, तर तुम्ही भाड्याने देखील घेऊ शकता. पेट्रोल पंपासाठी 800 ते 1200 स्क्वेअर मीटर एवढी जागा लागते. राष्ट्रीय किंवा राज्य महामार्गावर पेट्रोल पंप व्यवसाय सुरू करायचा असेल, तर किमान 1200 स्क्वेअर मीटर एवढी जागा असणे आवश्यक आहे.
तुम्हाला पेट्रोल पंपासाठी किती जागा लागते हे जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तुम्हाला कळून जाईल. कंपनी जेव्हा जाहिरात प्रसिद्ध करते त्यानंतर आलेल्या अर्जातून लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड केली जाते. जाहिरात जेव्हा प्रसिद्ध होईल तेव्हा संपूर्ण माहिती दिलेली असेल. (Petrol Pump Business Profit)
पेट्रोल पंपासाठी अर्ज प्रक्रिया..
इंडियन ऑईल पेट्रोल पंप वाटप करण्यासाठी वृत्तपत्रात (Newspaper) जाहिरात प्रसिद्ध करत असते. (Petrol Pump Business Online Application) जाहिरात मध्ये अर्जाची संपूर्ण माहिती दिलेली असते. तसेच ही जाहिरात इंडियन ऑईल कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर www.iocl.com देखील पाहायला मिळेल. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार अर्ज करत असतात. इंडियन ऑईल कंपनीची टीमद्वारे तयार करण्यात आलेल्या रिसर्चनुसार पेट्रोल पंप सुरू करायचा ही नाही याचा निर्णय घेते.
हे देखील वाचा-
घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
योजना सौर पॅनेल बसवा आणि २५ वर्ष मोफत वीज मिळवा.
1 KW सोलर लावायला काय खर्च येईल? त्यावर काय काय चालू शकते??