Good News.! CRPF, CISF, BSF, SSB आणि ITBP मध्ये 84000 पदांसाठी होणार बंपर भरती…
CAPF Recruitment 2022, SSC CAPF Recruitment 2022: CAPF भर्ती 2022, SSC CAPF भर्ती 2022 सरकारी नोकऱ्यांसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली बातमी आहे. केंद्र सरकारने केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) अंतर्गत 84405 पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. CAPF आणि आसाम रायफल्समधील सर्व रिक्त पदांवरील भरती डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण केली जाईल, असे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे. पुढील वर्षअखेरीस या पदांवरील भरती पूर्ण होईल, केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत याबाबत माहिती दिली आहे.
![](https://abdnews.in/wp-content/uploads/2022/10/CAPF-Bharti-2022-1068x712-1-1024x683.jpg)
सर्वाधिक रिक्त पद केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) आहे. सीआरपीएफमध्ये 27 हजार 510 जागा रिक्त आहेत. सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) 23 हजार 435 पदे रिक्त आहेत. त्याच वेळी, औद्योगिक सुरक्षा दलात (CISF) 11 हजार 765 पदे, सशस्त्र सीमा बल (SSB) मध्ये 11 हजार 143 पदे, आसाम रायफल्समध्ये 6 हजार 44 पदे आणि ITBP मध्ये 4 हजार 762 पदे रिक्त आहेत.
CAPF Recruitment 2022
● संस्थेचे नाव – केंद्रीय सशस्त्र पोलीस दल
● पदाचे नाव – CRPF, BSF, CISF, SSB,
आसाम रायफल्स, ITBP
● एकूण पोस्ट – 84000
CAPF Recruitment 2022 (CRPF, BSF, CISF, SSB, Assam Rifles, ITBP) Vacancy Details
![](https://abdnews.in/wp-content/uploads/2022/10/Screenshot_2022_1001_123233-300x294.jpg)
SSC CAPF Recruitment 2022 Educational Qualification
उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड / संस्थेतून 10 वी / 12 वी उत्तीर्ण असावा.
● अर्ज कसा करावा Apply Mode– Online
● कोण करू शकतो Apply: Who Can Apply —All India Candidate, Male And Female
CAPF Recruitment 2022
Pagar Salary (Pay Scale)
Rupees. 21,700/- to 69,100/- per month
● अर्ज शुल्क: Application Fee-
• General, OBC, EWS Candidates Fee :-200/-
• SC, ST Candidates Fee :- 0/-
Official Website @ https://upsc.gov.in
अग्निवीरांसाठी 10% आरक्षण
केंद्रीय गृह राज्यमंत्री म्हणाले की, अग्निवीरांना कॉन्स्टेबल भरती प्रक्रियेत 10% आरक्षण मिळेल. विशेष म्हणजे जून महिन्यात केंद्र सरकारने लष्कर, नौदल आणि हवाई दलात सैनिकांच्या भरतीसाठी अग्निपथ योजना जाहीर केली होती. 25 हजार 271 कॉन्स्टेबल पदांची भरती प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती त्यांनी दिली. भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) सोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. सोबतच भरती प्रक्रिया वेळेत पार पडावी, अशा सूचना सर्व विभागांना देण्यात आल्या आहेत.