ग्रामसेवक पदाच्या भरती पात्रतेत झाला बदल !! जाणून घ्या काय आहेत नवीन नियम..!

ग्रामसेवक भरतीची नवीन जाहिरात जारी झालेली असून याविषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत.

● जसे की या पदासाठी अर्ज कोठे करावा…?
● अर्ज कधी करावा…?
● अर्ज कसा करावा…?
● शैक्षणिक पात्रता काय असेल…?
● वयोमर्यादा काय असेल…?
● परीक्षा कधी होतील…?
● ग्रामसेवकाला किती वेतन मिळते.. ?
● ग्रामसेवकाची कामे कोणती असतात…?
● परीक्षा पास होण्यासाठी कसा अभ्यास करावा लागेल…?
● त्याचा अभ्यासक्रम कसा असेल…? ई.

या सर्वांची माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत…

जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा..

शैक्षणिक पात्रता Gramsevak Bharti

तुम्हाला जर ग्रामसेवक बनायचं असेल तर कमीत कमी बारावी पास असणे आवश्यक आहे आणि बारावी मध्ये तुम्हाला कमीत कमी 60 टक्के गुण असणे आवश्यक आहे. आणि जर बारावी मध्ये 60% गुण नसतील, तर कृषी क्षेत्रातील विषयामध्ये पदविका किंवा पदवी धारण केलीली असावी, पदवी कोणत्याही क्षेत्रातील असेल तर अर्ज करू शकता, जसे की बी.ए., बी.कॉम, बी.एस.सी. किंवा इतर कोणतिहि 3 वर्षाची किंवा 4 वर्षाची पदवी तुमच्याकडे असणे गरजेचे आहे.

वरील पात्रमध्ये बसत असाल तरच तुम्ही ग्रामसेवक भरतीकरिता पात्र असाल. तसेच पदवी धारण केलेल्या उमेदवारास कोणत्याही टक्केवारीची अट नाही..

वयोमर्यादा (Age Limit For gramsevak Bharti)

☞ ग्रामसेवक भरतीसाठी शासनाने ठरवल्या वयोमर्यादेनुसार तुमचं वय कमीत-कमी 18 आणि जास्तीत-जास्त 38 वर्ष असावे.
☞ जर इतर संवर्गातून अर्ज करत असाल तर वय 38 वर्षापेक्षा जास्त नसावे आणि जर तुम्ही आरक्षित संवर्गातून अर्ज करत असाल तर शासनाच्या नियमाप्रमाणे तुम्हाला वयोमर्यादेत शिथिलता देण्यात येते.

अशी करावी ग्रामसेवकाच्या परीक्षेची तयारी ..?
Exam Preparation GramSevak Bharti

ग्रामसेवक भरतीसाठी 200 गुणांची लेखी परीक्षा घेतली जाते.

☞ यात मराठी या विषयाचे (15 प्रश्न)-30 गुण
☞ इंग्रजी विषयाचे (15 प्रश्न)-30 गुण
☞ अंकगणित व बुद्धिमत्ता (15 प्रश्न)-30 गुण
☞ सामान्य ज्ञान (15 प्रश्न)-30 गुण
☞ कृषी आणि तांत्रिक (40 प्रश्न) – 80 गुण
याप्रमाणे शंभर प्रश्न असतील आणि प्रत्येक प्रश्नास दोन गुण असतील असे एकूण 200 गुणांची परीक्षा असेल.

🕝 हे 200 गुणांची प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी तुम्हाला दीड तासांचा वेळ दिला जातो.

👉🏻 या परीक्षेमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नसते म्हणजे जर का कुठला प्रश्न चुकला तर त्याचे गुण कापले जात नाहीत म्हणजे तुम्ही सगळे प्रश्न सोडवू शकता.

👉🏻 प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय दिलेले असतात त्यापैकी बरोबरच पर्याय तुम्हाला निवडायचा असतो.

ग्रामसेवकाला वेतन किती मिळते…? GramSevak Salary

☞ Basic Pay – 5200-20200 शिवाय इतर अनुज्ञेय भत्ते सुद्धा दिले जातात.

ग्रामसेवकाची कामे Gram Sevak work details

ग्रामसेवकाला गावातील भरपूर कामे करावी लागतात जसे की,
☞ जन्म-मृत्यू नोंद,
☞ विवाह नोंद व वेळच्या-वेळी दाखले देणे.
☞ रहिवाश्याची इतर कामे,
☞ शासनाच्या योजनांची योग्य अमंलबजावणी,
☞ शासनाकडून मिळणाऱ्या निधीचा योग्य वापर करणे हे असतात.

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करा…
https://rdd.maharashtra.gov.in/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!