जॉब मिळवण्यासाठी पण Cibil Score 650 पेक्षा अधिक असणे आवश्य; Free मध्ये तपासा तुमचे सिबिल स्कोअर..

Cibil Score : वाचून आश्चर्य वाटलं ना! तुम्ही आतापर्यंत ऐकलं असेल की, Cibil Score हा फक्त कर्ज मिळवण्याकरिता अत्यावश्यक असतो. सिबिल स्कोअर कमी किंवा खराब असला की Loan मिळण्यात अडचण येते. मात्र आता फक्त Loan घेण्यासाठीच नाही तर नोकरी मिळवण्यासाठी देखील सिबिल स्कोअर महत्वाचा ठरणार आहे.

Cibil Score

कोणत्याही जॉबसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची credit history (क्रेडिट हिस्ट्री)ची तपासणी करण्यात आली असून बँकांनी मागील वर्षभरात याविषयीची एक अधिसूचना जारी केली आहे, त्यामुळे नोकरीसाठीसिबिल स्कोअर हा एक आवश्यक निकष म्हणून लावण्यात आला आहे.

मोफत सिबिल स्कोअर चेक करण्यासाठी क्लिक करा

Cibil Score

कोणत्याही प्रकारचे कर्ज देत असताना बँका/ वित्तीय संस्था अर्जदाराचे सिबिल स्कोअर तपासतात, CIBIL मुळे यापूर्वी अर्जदाराने यापूर्वी कितीदा कर्ज घेतले आणि त्या कर्जाची परतफेड कश्या पद्धतीने केली, याची माहिती मिळते. सरळ आणि सोप्या शब्दात सांगायचे तर तुम्ही कर्जाची परतफेड करण्यासाठी किती प्रामाणिक आहात, हे दिसून येते. अश्याच प्रकारचा प्रामाणिकपणा नोकरी देताना उमेदवारांत शोधत असून बँकांनी जॉबसाठी सिबिल स्कोअरचा कॉलम जोडला आहे. बँकेत नोकऱ्यांसाठी आता बँका आणि वित्तीय संस्था अर्जदाराची क्रेडिट हिस्ट्री तपासत आहेत. जॉबसाठी अर्जदार उमेदवाराचा सिबिल स्कोअर 700 पेक्षा अधिक असेल तर तो चांगला मानण्यात येतो.

Cibil Score ठरवण्याचे निकष खालीलप्रमाणे

30% सिबिल स्कोअरहा तुम्ही नियमीतपणे कर्जाची परतफेड करत आहे की नाही, यावर ठरतो.
25% सिबिल स्कोअर हे तुम्ही सुरक्षित की असुरक्षित मध्ये कोणत्या प्रकारचे कर्ज घेतले आहे यावर ठरते.
25% सिबिल स्कोअर क्रेडिट एक्सपोजर तर 20% सिबिल स्कोअर कर्ज हे त्या कर्जाच्या वापरावर ठरते.

मुलींना मिळणार “इतके” रुपये; जाणून घ्या का?

Cibil Score हा 300 ते 900 याच्या दरम्यान असतो. जर तुमचा Cibil Score 750 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तो अत्यंत चांगला 550 ते 750 दरम्यानचा क्रेडिट स्कोअर हा मध्यम तर 300 ते 550 दरम्यानचा स्कोअर हा अत्यंत वाईट समजण्यात येतो.

IBPS ने घेतला निर्णय

मागील वर्षी जुलै महिन्यामध्ये IBPS (बँकिंग रिक्रुटमेंट एजेन्सी इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनेल सिलेक्शन) ने SBI वगळल्यास इतर सरकारी बँकेत जॉबसाठी Cibil Score अनिवार्य करण्यात आला आहे. म्हणजेच बँकेत जॉबसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा Cibil Score 650 पॉईंटपेक्षा जास्त असणे अत्यंत आवश्यक आहे.

त्यामुळे बँकेत जॉबसाठी अर्ज करण्यापूर्वी आपला Cibil Score तपासून घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!