Best call recording app 2024: कॉल रेकॉर्डिंग App डाऊनलोड करण्याची सोपी पद्धत जाणून घ्या!

Best call recording app : जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला कॉल करतो तेव्हा ते संभाषण आपल्याला पुराव्याच्या रुपात जतन करावायाचे असल्यास बऱ्याच मोबाईलमध्ये call recording हा पर्यायाचा वापर केला जातो. वापरकर्त्यांची कॉल रेकॉर्ड करण्याची गरज लक्षात घेऊन जवळपास सर्वच मोबाईल कंपन्यांनी त्यांच्या प्रत्येक मोबाईलमध्ये ऍटोमॅटिक कॉल रेकॉर्ड करण्याची व्यवस्था केली होती, मात्र Google ने अशा बाबीवर बंदी घातल्यामुळे अशा पद्धतीचे कॉल रेकॉर्डिंग ॲप बंद झाले आहे. त्यामुळे आपल्याला प्ले स्टोअरवर असलेल्या ॲपच्या माध्यमातून call recording app डाऊनलोड करावे लागते. म्हणून हे थर्ड पार्टी ॲप कसे डाऊनलोड करायचे आणि त्याचे काय फायदे असतात तसेच सरकारने ने अशा थर्ड पार्टी कॉल रेकॉर्डिंग ॲपवर बंदी का घातली हे जाणून घेणार आहोत

call recording app

या प्रकारे डाऊनलोड करा call recording app

तुमच्या अँड्रॉइड मोबाईलच्या Play store वरील सर्च बारमध्ये call recording app टाईप केल्यावर तुम्हाला अनेक ॲप दिसतील, त्यातील 4+ स्टार असलेले कोणतेही एका ॲपची निवड करून ते call recording app तुमच्या मोबाईलमध्ये ओपन करा.

त्यानंतर ते ॲप तुमच्या मोबाईलची परमिशन मागेल त्याला allow करा, कारण परमिशन दिल्याशिवाय call recording app तुमच्या मोबाईलमध्ये व्यवस्थित काम करणार नाही, त्यामुळे तुम्हाला ते ॲप वापरण्याची परवानही द्यावीच लागेल. त्यानंतर
तुम्ही कॉल रेकॉर्डिंग ॲप वापरुन तुमचे कॉल रेकॉर्ड करु शकता.

कॉल रेकॉर्ड करण्याचे फायदे

न्यायालयीन मान्यताप्राप्त पुरावा

कॉल रेकॉर्डिंगचा सर्वात महत्त्वाचा आणि मोठा फायदा म्हणजे, तुमच्या आणि समोरच्या व्यक्तीत झालेल्या संभाषणाचा तो एक महत्त्वाचा पुरावा ठरतो. न्यायालयमध्ये कॉल रेकॉर्डिंग हे मान्यताप्राप्त पुराव्यांत येतात. अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये call recordingच्या माध्यमातूनच संबंधीत व्यक्तीला न्याय मिळालेला आहे.

शिक्षणाकरिता महत्त्वाचा दुवा

एखाद्या विषयाच्या बाबतीत डॉक्युमेंटेशन करण्याकरिता विद्यार्थी कॉल रेकॉर्डिंगचा वापर करु शकतात. डॉक्टरेट प्रबंध सादर करतावेळी बऱ्याच प्रसिद्ध व्यक्तिंच्या मुलाखती घेण्याचे प्रसंग येतात,अशा प्रसंगी एखाद्या दूरच्या व्यक्तीबरोबर अभ्यासाविषयीचे बोलणे तुम्हाला कॉल रेकॉर्डिंगच्या सहाय्याने जतन करून अभ्यासासाठी वापरता येऊ शकते.

ऑफिसच्या डॉक्युमेंटेशनसाठी वापर

कोरोना महामारीच्या काळानंतर बरेच नोकरदार व्यक्ती अजून सुद्धा बऱ्याच कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना घरातूनच काम म्हणजेच work from home करण्यास सांगतात. अशावेळी तुमच्या बॉसने कामासंबंधी दिलेल्या सूचना call recording app च्या माध्यामातून जतन करून त्यावर काम करता येते.

best call recording app मध्ये तुम्हाला अनेक पर्याय मिळतील जसे की,

  • Call Recorder–Cube ACR
  • Automatic Call Recorder Pro
  • Easy Voice Recorder
  • Super Call Recorder
  • RMC Android Call Recorder
  • Call Recorder
  • Call Recorder–CallsBox
  • Call Recorder Automatic
  • HD Auto Call Recorder 2024
  • Call Recorder–Lovekara
  • Call Recorder–CallX

कॉल रेकॉर्ड करण्यावर गुगलने बंदी का घातली?

Call Recording या ॲपवर Google ने काही दिवसांपूर्वी बंदी घातली आहे. त्यामुळे कोणीतीही व्यक्ती त्यांच्या मोबाईलमध्ये थर्ड पार्टीचा एप्लीकेशनचा वापर करून कॉल रेकॉर्ड करू शकत नाही. काही नामांकित कंपन्यांच्या मोबाईलमध्ये इनबिल्ड कॉल रेकॉर्डिंगचा पर्याय असायचा त्याला सेटिंगमध्ये जाऊन डीफॉल्ट call recording ही सेटिंग केली की ऑटोमॅटिक कॉल रेकॉर्ड होत असे. मात्र, नंतर आपल्याला मॅन्युअली व्यक्तींचे नंबर निवडून सेटिंगमध्ये त्यांची नोंदणी केल्यानंतरच आपण समोरच्या व्यक्तीला कॉल केला किंवा त्या व्यक्तीचा कॉल आला तर फक्त तोच कॉल रेकॉर्ड होतो, शिवाय कॉल रोकॉर्ड होण्यापूर्वी हा कॉल रेकॉर्ड होत असल्याची सूचना समोरच्या व्यक्तीला मिळते त्यामुळे समोरच्या बोलणाऱ्या व्यक्तीला हे कळते की त्यांचा कॉल रेकॉर्ड होत आहे.

सावधान : समोरच्या व्यक्तीच्या परवानगी/सहमतीविना त्यांचे कॉल रेकॉर्ड करणं बेकायदेशीर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!