Bob Personal Loan : फक्त 5 मिनिटात मिळेल 50 हजाराचे कर्ज ! या पद्धतीने घरबसल्या करू शकता ऑनलाइन अर्ज

Bob Personal Loan :- पैसा ही एक बाब अशी आहे की जी माणसाला सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी लागतच असतो. समाजात जे काही चालले आहे ते फक्त आणि फक्त पैशांसाठीच चाललेलेे आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

Bob Personal Loan

त्यामुळेच तर मानवाच्या जीवनामध्ये पैशाला खूपच महत्त्व प्राप्त झाले आहे. पैशासाठी प्रत्येक जण काहीतरी व्यवसाय/नोकरी पैसा कमावतो. पैसा प्रत्येक जण कमावतो मात्र, पैश्याची बचत बरोबरच त्याची गुंतवणूक या गोष्टी सुद्धा खूपच महत्त्वाच्या असतात.

चुकीने घेतलेल्या निर्णयामुळे बऱ्याचदा माणसाच्या हातात पैसा टिकत नाही, आणि त्यामुळे भविष्यात अचानक काही आर्थिक गरज उद्भवली अथवा हॉस्पिटल सारखी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली त्यावेळी आपल्याला मित्रपरिवार/नातेवाईक, अथवा इतर व्यक्तींकडून व्याजाने पैसे घ्यावे लागते.

सरळसोप्या भाषेत सांगायचे म्हणजे आपल्याला कर्ज घ्यावे लागते. आणि याच कर्जाच्या अनुषंगाने विचार केल्यास अनेक बँका या डिजिटल स्वरूपामध्ये म्हणजेच ऑनलाइन पद्धतीने वैयक्तिक कर्ज देत असतात. याशिवाय अनेक एनबीएफसी कंपन्या म्हणजेच नॉन बँकिंग फायनान्स कंपन्या सुद्धा कर्जाचा पुरवठा करतात. Bob Personal Loan

बँकांचा विचार केल्यास अशा अनेक बँका आहेत जे पर्सनल लोन अर्थात वैयक्तिक कर्ज देत असतात, आणि त्यात जर आपण बँक ऑफ बडोदाचा विचार केला तर बँक ऑफ बडोदा Bob Personal Loan ही बँक सुध्दा तुम्हाला अवघ्या काही मिनिटांटच 50 हजार रुपयापर्यंतचे वैयक्तिक कर्ज देते. मात्र हे कर्ज नेमके कसे मिळते अथवा त्यासाठी कुठली पात्रता लागते याविषयीचीच संपूर्ण माहितीच आपण या लेखाद्वारे जाणून घेणार आहोत.

बँक ऑफ बडोदा ही बँक देते पर्सनल लोन (Bob Personal Loan)

डिजिटल पर्सनल लोन म्हणजेच डिजिटलरित्या वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी तुम्ही कोणत्याही खाजगी अथवा सरकारी बँकेत अर्ज करू शकतात. तसे जर पाहायला गेलो तर बँकांकडून सुद्धा वैयक्तिक कर्जाची ऑफर दिली जाते.

डिजिटलरित्या वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी तुम्हाला सर्वात आगोदर अर्ज करावा लागतो, अर्ज केल्यानंतर बँकेचे अधिकारी तुमची कागदपत्रे तपासतात. जर तुम्ही कर्ज घेण्याची पात्रता पूर्ण करत असाल आणि तुमची कागदपत्रे बरोबर असल्यास तुम्हाला बँकेकडून लगेच कर्ज वितरित केले जाते.

बँक ऑफ बडोदाकडून( Bob Personal Loan) पर्सनल लोन घ्यावयाचे असल्यास असा करा ऑनलाइन अर्ज

  • सर्वात पहिले तुम्हाला तुम्ही बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाईट https://dil2.bankofbaroda.co.in/pl/ वर जाऊन त्यात पर्सनल लोन या पर्यायावर क्लिक केल्यास तुमच्यासमोर एक अर्ज उघडतो.
  • या अर्जात तुमचे नाव, तुमचा पत्ता, तुमचा मोबाईल नंबर बरोबरच इतर महत्त्वाची माहितीची विचारणा केलेली असते व ती तुम्हाला नमूद करावीच लागते.
  • तुमची माहिती प्रविष्ट केल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईलवर एक ओटीपी पाठवण्यात येतो व ज्याची पडताळणी तुम्हाला करावी लागते.
  • मोबाईल नंबर पडताळणी केल्यानंतर अर्ज भरण्यापूर्वी तुम्हाला बँकेने नमूद केलेल्या सर्व अटी व शर्ती मान्य कराव्याच लागतात, अटी व शर्ती मान्य केल्यानंतरच तुम्हाला कर्जाचा अर्ज भरता येतो.
  • भारतामध्ये माहिती भरत असताना त्यात सर्वप्रथम तुमचे नाव, पत्ता, तुमचा जिल्हा, तुमचा मोबाईल नंबर, तुमचा आधार कार्डनंबर बरोबरच बँकेचा खाते क्रमांक या प्रकारची माहिती विचारलेली असते, ती माहिती भरल्यानंतरच तुम्हाला पुढे जाता येते.
  • संपूर्ण माहिती भरल्यानंतर त्याखाली सबमिट हे बटन असते त्यावर क्लिक केल्यानंतर तुमचा अर्ज सबमिट होतो.
  • त्यानंतर बँकेकडून तुमचा अर्ज तपासण्यात येतो, आणि जर तुम्ही कर्ज घेण्यास पात्र असाल तर लगेच तुमच्या बँक खात्यात कर्जाची रक्कम क्रेडिट केली जाते.

    अशा सोप्या पद्धतीने तुम्हाला बँक ऑफ बडोदाकडून Bob Personal Loan कमीत कमी कालावधीत 50 हजार रुपयापर्यंतचे कर्ज घेता येते.

बँक ऑफ बडोदाकडून कोण-कोणत्या कारणांसाठी वैयक्तिक कर्ज घेऊ शकता?

  1. वैयक्तिक कारणांकरिता
  2. पैशांची खूपच गरज असल्यास
  3. लग्नासाठी पैशांची आवश्यकता असल्यास
  4. शिक्षण अथवा ट्यूशनची फी भरण्याकरिता
  5. प्लॉट अथवा घराची खरेदी करण्याकरिता
  6. घरची दुरुस्त करण्यासाठी
  7. परदेश प्रवास करण्यासाठी
  8. कार खरेदी करण्यासाठी

BOB वैयक्तिक कर्जाची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे

  • कमाल रक्कम 50 हजारांपर्यंत मिळू शकते.
  • कर्ज परतफेड कालावधी जास्त असतो..
  • क्रेडिट कार्डवर अतिरिक्त लाभ मिळतो.
  • कर्जाची त्वरित मंजुरी
  • कमीत कमी कागदपत्रांची आवश्यकता
  • पेन्शनधारकांकरिता किमान व्याजदर.
  • वेळेवर कर्जाच्या हपत्याची रक्कम भरल्यास सिबिल स्कोअर Cibil score झपाट्याने सुधारतो.

बँक ऑफ बडोदा वैयक्तिक कर्जाचे व्याज दर

आता वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी सर्वात महत्वाचा असतो व्याजदर, जर तुम्ही बँक ऑफ बडोदाकडून वैयक्तिक कर्ज घेतल्यास वैयक्तिक कर्जावरील व्याजदर कमीत कमी 9.35% ते जास्तीत जास्त 15.60% प्रतिवर्ष असतो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!