Home Loan: मोदी सरकारचा धमाकेदार निर्णय ! घर खरेदी करणाऱ्यांना मिळणार स्वस्तात गृहकर्ज, जाणून घ्या सविस्तर माहिती..
Home Loan: शहरांतील रहिवाश्यांना सवलतीच्या दराने गृहकर्ज देण्यासाठी (Home Loan) सरकार (Modi Government) येणाऱ्या पाच वर्षांत सुमारे 60 हजार कोटी रुपये खर्च करण्याच्या विचारधीन आहे.
2023 या वर्षअखेरीस होणाऱ्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका तसेच पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी अशी योजना सुरू करण्याची दाट शक्यता आहे. शहरी भागात राहणाऱ्या आणि कमी उत्पन्न असलेल्या कर्जदारांना सरकारतर्फे व्याजमध्ये अनुदान देण्याची ही काही पहिलीच वेळ नाही.
व्यवसायासाठी मुद्रालोनसाठी अर्ज करण्यासाठी पाहिजे क्लिक करा
सरकारने अशीच एक योजना सन 2017-2022 दरम्यान सुरू केली होती, त्या योजनेअंतर्गत तब्बल एक कोटीहून अधिक घरांना मंजुरी देण्यात आली होती. वास्तविकत: अशी योजना आणण्याची घोषणा भारताचे माननिय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर केली होती. मात्र त्याची माहिती जाहीर करण्यात आली नव्हती. आता एका सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीप्रमाणे, 9 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज 3 ते 6.5 टक्के दराने दिले जाईल.
या नागरिकांना मिळणार Home Loanचा फायदा –
मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व लोक या योजनेकरिता पात्र असतील जे 20 वर्षांच्या कालावधीकरिता 50 लाख रुपयांपेक्षा कमी गृहकर्ज (Home loan) घेतील. आणि व्याजाची सवलत सरकारतर्फे आधीच लाभार्थ्यांच्या गृहकर्ज खात्यात जमा करण्यात येईल. ही योजना प्रत्यक्षात आल्यास शहरात राहणार्या तब्बल 25 लाख लोकांना फायदा होऊ शकतो.
कर्ज पाहिजे असल्यास क्लिक करा
दरम्यान, आणखी एका अधिकाऱ्याने माहिती दिली की, ते येणाऱ्या काळामध्ये एक नवीन योजना आणत असून त्या योजनेचा फायदा त्या कुटुंबांना होईल जे शहरांमध्ये राहतात. मात्र, जास्त भाड्यामुळे त्यांना झोपडपट्टी, चाळी किंवा अनधिकृत वसाहतींमध्ये राहावे लागते. सध्या बँकांना कोणतीही मदत देण्यात आलेली नाही, मात्र यासंदर्भात लवकरच सरकारची बैठक होण्याची दात शक्यता आहे. बँकांनी लाभार्थ्यांची ओळख पटवण्यास सुरुवात केली आहे.
कर्ज पाहिजे असल्यास क्लिक करा
आगामी काळामध्ये देशाच्या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका असून या निवडणुकांच्याच पार्श्वभूमीबरोबरच 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असा निर्णय घेतला जाऊ शकेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. याच निवडणुकीकरिता मागील महिन्यात स्वयंपाकाच्या एलपीजी सिलिंडरची किंमत प्रतिसिलिंडर १८ टक्क्यांनी कमी करण्यात आली होती. अशाच प्रकारे गृहकर्जांवर (home finance) देखील व्याजअनुदान (Home Loan) दिले जाईल, असा सूतोवाच नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्टला केलेल्या भाषणामध्ये केला होता.