HDFC Personal Loan : HDFC बॅंकेकडून 10 सेकंदात मिळवा 40 लाखांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज..

HDFC Personal Loan : तुम्हाला पैशांची नितांत आवश्यकता असेल आणि त्यासाठी तुम्ही वैयक्तिक कर्ज घेण्याचा विचारात असाल, तर तुम्हाला HDFC बॅंक कमीत कमी कागदपत्रात कर्ज उपलब्ध करून देत आहे. या लेखात आम्ही तुम्हाला HDFC बँकेत वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आणि त्यासाठी लागणारी कागदपत्रे, व्याजदरची माहिती जाणून घेणार आहोत.

HDFC Personal Loan

जर तुम्ही पूर्वीपासूनच HDFC बँकेचे ग्राहक नसाल तरीसुद्धा तुम्ही HDFC बँकेकडून 4 तासांपेक्षा कमी वेळेमध्ये पर्सनल लोन घेऊन तुमच्या पैश्यांची गरज पूर्ण करू शकता. आता इथं लक्षात ठेवण्यासाठीची एक महत्वाची गोष्ट म्हणजे HDFC बँकेच्या पर्सनल लोनच्या व्याजदरात सातत्याने बदल होत राहतो. जर तुम्ही HDFC कडून पर्सनल लोन घेण्यास इच्छुक असाल तर तुम्हाला बँकेतर्फे अनेक प्रकारचे फायदे मिळतात.

HDFC बॅंकेकडून Personal Loan घेण्याकरिता तुम्हाला कोणतीही वस्तू तारण ठेवण्याची गरज नसून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्याकरिता तुम्ही तुमच्या सवडीनुसार परतफेडीच्या कालावधीची निवड करू शकता.‌ वैयक्तिक कर्ज मिळाल्यावर, तुम्हाला मिळालेली रक्कम कुठेही आणि कोणत्याही कामासाठी वापरू शकता. तुम्हाला ही सुविधा HDFC बॅंकेशिवाय इतर कोणत्याच बँकेकडून मिळणार नाही .

HDFC बॅंकेकडून 10 सेकंदात असे मिळवा कर्ज HDFC Personal Loan

HDFC बॅंक ग्राहकांना फक्त 10 सेकंदामध्येच कर्ज उपलब्ध करून देते. मात्र, जे HDFC Bank चे ग्राहक नाहीये त्यांना सुद्धा वैयक्तिक कर्ज देण्यासाठी चार तासांपेक्षा कमी कालावधी लागतो. शिवाय हे कर्ज घेण्याकरिता तुम्हाला अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता नसून अगदी कमीत कमी कागदपत्रांत आणि सहजरित्या कर्जासाठी अर्ज करू शकता.

HDFC बॅंकेकडून मिळवा HDFC Personal Loan 40 लाखांपर्यंत कर्ज

  • HDFC बॅंकेकडून तुम्हाला 50 हजार ते 40 लाखांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज घेता येते. यासाठी व्याज दर 10.75% असून थकीत EMI दर 2% दर महिना आहे. म्हणूनच कर्ज घेतांना बँकेच्या अटी व शर्ती पूर्णपणे वाचून समजून घेणं आवश्यक आहे.
  • HDFC वैयक्तिक कर्जाची रकमेची परतफेड करण्याकरिता कमीत कमी 12 तर कर्जाच्या जास्तीत जास्त 60 महिने म्हणजेच 5 वर्षे दिले जातात. HDFC LOAN च्या EMI वर दर महा 2149 रुपयांच्या कर्जाची रकमेची परतावणा करता येते.

HDFC Personal Loan घेण्याकरिता लागणारी पात्रता खालीलप्रमाणे

  • HDFC बॅंकेकडून पर्सनल लोन घेण्याकरिता अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे वय 21 ते 60 वर्षे या दरम्यान असावे.
  • अर्जदाराने कर्ज घेण्यापूर्वी कोणत्याही ठिकाणी सतत 2 वर्षे काम केलेले असावे.
  • HDFC बँक वैयक्तिक कर्ज घेणाऱ्या ग्रामीण भागातील अर्जदाराचे महिन्याचे किमान उत्पन्न 12,000 रुपये वा त्यापेक्षा जास्त तर शहरातील अर्दराचे किमान उत्पन्न 15,000 रुपये वा त्यापेक्षा जास्त असावे.

HDFC Personal Loan घेण्याकरीता येथे करा संपर्क

HDFC बॅंकेकडून वैयक्तिक कर्ज घेण्याकरिता तुम्ही HDFC बॅंकेच्या अधिकृत वेबसाईटवर सुद्धा अर्ज करू शकता. तुम्हाला या वेबसाईटवर वैयक्तिक कर्जाविषयी सविस्तर माहिती मिळेल. किंवा तुम्ही पर्सनल लोन घेण्यापूर्वी HDFC बॅंकेच्या शाखेत जाऊन विचारपूस करावी.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:

ओळख पुरावा (खालीलपैकी कोणता एक)
◆ आधार कार्ड
◆ मतदार ओळखपत्र
◆ पासपोर्ट
◆ ड्रायव्हिंग लायसन्स

बँक स्टेटमेंट: तुमच्या आर्थिक व्यवहारांची नोंदसाठी गेल्या 3 ते 6 महिन्यांचे बँकेचे स्टेटमेंट.

उत्पन्नाचा पुरावा : तुमच्या उत्पन्नाचा पुरावा म्हणून मागच्या 2 महिन्यांच्या पगार स्लिप बरोबरच तुमचा फॉर्म नंबर 16 सुद्धा लागेल.

HDFC बँकेत वैयक्तिक कर्ज घेण्याकरिता अर्ज करण्याची पद्धत खालील प्रमाणे:

  • सर्वप्रथम HDFC बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • त्यानंतर वेबसाईटवर “Borrow”दिसेल त्या लिंकवर क्लिक करा.
  • लिंकवर केल्यावर तुम्हाला “पेपरलेस लोन” पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे.
  • त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज दिसेल तिथे तुम्हाला ऑनलाइन फॉर्म भरावे लागणार आहे.
  • त्या फॉर्ममध्ये खालील प्रकारची माहिती भरा:
  • सगळ्यात पहिले तुमचा आधार नोंदणीकृत मोबाईल क्रमांक लिहा.
  • नंतर तुमची जन्मतारीख टाईप करा.
  • आता तुमच्या मोबाईलवर एक OTP (one time passward) ये तो OTP आता तिथे टाका.
  • त्यानंतर कर्जाचा प्रकार निवडून आवश्यक असलेली कर्जाची रक्कम टाका.
  • नंतर वेबसाईटवर नमूद केलेल्या कागदपत्रांशी संबंधित संपूर्ण माहिती इथे प्रविष्ट करा.
  • त्यानंतर तुम्ही प्रविष्ट केलेली सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री केल्यानंतरच फॉर्म सबमिट करा.
  • तुम्ही सबमिट केलेल्या कागदपत्रांची पडताळणी कंपनीच्या सिस्टीमद्वारे केल्यानंतर तुम्ही या लोनसाथी पात्र ठरल्यास, पुढच्या 10 सेकंदाच्या आत 50,000 रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज तुमच्या खात्यात जमा केले जाईल.

काही महत्त्वाचे मुद्दे:
1. HDFC बँक आपल्या विद्यमान असलेल्या ग्राहकांना मात्र 10 सेकंदात कर्ज उपलब्ध करून देण्याचे वचन जरी देत असेल मात्र जर तुम्ही या HDFC बँकेचे ग्राहक नसाल तुम्हाला कर्ज मिळवण्याकरिता कमीतकमी 4 दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे, कारण HDFC बँक ही तुमची सर्व माहितीची तपासणी केल्यावर तुम्हाला कर्ज देऊ शकेल.

2. तुमच्या पगाराप्रमाणे कर्जाचा वार्षिक व्याजदर हा 11% पर्यंत असू शकतो, आणि याकरिता 4,999/- रुपये प्रोसेसिंग म्हणजेच प्रक्रिया शुल्क आहे जी तुम्हाला भरावी लागेल.

मोफत तपासा तुमचे सिबिल स्कोअर

रोल्स रॉयस खरेदी करणाऱ्याला पाळावे लागतात कंपनीचे हे 10 नियम,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!