how to Check Cibil Score: सिबिल स्कोअर या प्रकारे मोबाईलवर तपासा, फक्त 2 मिनिटांमध्ये

how to Check Cibil Score
how to Check Cibil Score:
सद्यस्थिती पाहता आपण आपल्या घरातल्या प्रत्येक वस्तू या लोनवर घेत असतो. जसे मोबाईल असो अथवा टिव्ही, वॉशिंगमधीन असो अथवा फ्रिज, लॅपटॉप असो वा कॉम्प्युटर, काही जण मुलांच्या शिक्षणासाठी सुध्दा loan घेतात. म्हणजेच काय तर आजकाल सगळ्याच गोष्टी EMIवर मिळतात. एकदा कर्ज घेऊन त्याचे दरमहा EMI वर हप्ते भरायचे.

आता तुम्ही घर घेण्यासाठी किंवा वाहन घेण्यासाठी कर्ज घ्यायचे असल्यास सर्वात पाहिले तुम्हाला विचारला जातो तो तुमचा सिबिल स्कोअर. आता हा सिबिल स्कोअर म्हणजे नक्की काय? आणि तो कसा तपासता येईल या संदर्भातील सर्व माहिती आम्ही तुम्हाला या लेखात सविस्तरपणे सांगणार आहोत.

How to Check Cibil Score

सिबिल स्कोअर म्हणजे नक्की काय असते? how to Check Cibil Score

सिबिल स्कोर हा प्रत्येक व्यक्तीच्या आर्थिक लेखाजोडा मांडणारा तीन अंकी सारांश असतो. CIBIL त्याचा अर्थ म्हणजे क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो (इंडिया) लिमिटेड (Credit Information Bureau (India) Limited), CIBIL हा एक असा डाटा असतो जिथे प्रत्येक व्यक्तीच्या आर्थिक गणिताची नोंद ठेवली जाते. आणि मुख्य म्हणजे सिबिलद्वारेच कर्ज घेतलेल्या एखाद्या व्यक्तीचे आर्थिक उत्पन्नाचा कसा वापर केला आहे, जसे की गृह कर्ज Home loan, वैयक्तिक कर्ज personal loan, आणि क्रेडिट स्कोर यांची पूर्ण माहिती मिळते.

जर तुमचा सिबिल स्कोअर हा चांगला असेल तर आणि तरच तुम्हाला बॅंक/वित्तीय संस्थांकडून लगेच आणि कमीतकमी व्याजदराने कर्ज देऊ शकतात. पण जर का तुमचा सिबिल स्कोअर खराब किंवा कमी असेल तर मात्र तुम्हाला कर्ज देण्यास बँक/वित्तीय संस्था तयार होत नाही, आणि त्या व्यक्तीला कर्ज घेण्यास खूप अडचणी येतात. सर्वसाधारणत: 750 पेक्षा जास्त स्कोअरची गणना ही चांगल्या सिबिल स्कोअर मध्ये होते. क्रेडिट स्कोअरच्या हिस्ट्रीमध्ये हे देखील पाहण्यात येतं की तुम्ही पूर्वी घेतलेली कर्जाचे हफ्ते वेळच्या वेळी फेडली आहेत की नाही.

Good सिबिल स्कोअर म्हणजे नेमकं काय?

सिबिल स्कोअर मोजण्याकरिता एक पॅरामिटर ठरविण्यात आलेला असून सिबिलचा पॅरामिटर 300 ते 900 पर्यंतचा असतो, म्हणजे जेवढा जास्त तुमचा सिबिल स्कोअर आर्थिक कुंडली तेवढी चांगली. जर तुमचा सिबिल स्कोअर 900च्या आसपास असेल, तर तुम्हाला loan देण्यास कोणीही नाकारू शकत नाही, पण जर का तुमचा सिबिल 300 च्या जवळपास असेल तर तुम्हाला कोणीही loan देणार नाही हे मात्र काळ्या दगडावरील पांढरी रेष आहे

सिबिल स्कोर चांगला असल्यास हे फायदे मिळतील…

तुमचा सिबिल स्कोअर चांगला आसल्यावर State Bank of India तुम्हाला कमीतकमी व्याजदराने loan देते. म्हणजे की, तुमचा सिबिल स्कोअर 800 च्या वर असेल तर तुम्हाला 8.55 टक्के व्याजदराने, 750-799 या मध्ये असेल तर 8.65 टक्के दराने, 700-749 या मध्ये असेल तर 8.75 टक्के व्याजदराने कर्ज मिळते. तर 650-699 स्कोअर असलेल्यांना 8.85 टक्के व 550-649 स्कोअर असलेल्यांना 9.05 टक्के दराने loan मिळते. याचा अर्थ असा की जितके तुमची सिबिल कमी तितके जास्तीचे व्याज तुम्हाला द्यावे लागते.

असा पाहा मोबाईलवर सिबिल स्कोअर: how to check cibil score on mobile

CIBIL Score | Credit Score | Credit Report | Loan Solutions तुम्ही गुगलवर सर्च करुन सुद्धा वेगवेगळ्या वेबसाईटवर तुमचा सिबिल स्कोअर तपासू शकता. सिबिल साईटवर गेल्यावर Get your CIBIL SCORE. वर तुमची वैयक्तिक माहिती भरून तुमचा सिबिल स्कोअर पाहू शकता.

याशिवाय सर्वांच्या मोबाईलमध्ये G-pay किंवा Phone-pe ही एप्लीकेशन असतातच. या दोन्ही अँपमध्ये Get your CIBIL SCORE हा पर्याय दिलेला असतो. त्यावर क्लिक करून सुद्धा तुम्ही तुमचा सिबिल स्कोअर बघू शकता. how to Check Cibil Score

तुमच्या संपूर्ण आर्थिक इतिहास जाणून घेण्यासाठी CIBIL score महत्त्वाचे

तुमच्या संपूर्ण आर्थिक इतिहास म्हणजेच तुम्ही आतापर्यंत घेतलेली कर्जे, फेडलेले EMI, एखाद दुसरा हफ्ता फेडण्यास झालेला उशिर अथवा एखादा कर्ज न फेडण्यास तुमचा CIBIL स्कोअर कमी होतो. आणि सिबिल कमी झाल्याने तुम्हाला कर्ज मिळविण्यास खूप अडचणी येतात. त्यासाठी तुमचा सिबिल स्कोअर चांगला असला पाहिजे, याकरिता तुम्हाला स्वतः काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. पहिली गोष्ट म्हणजे एकाच वेळी अनेक loan घेऊ नयेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे कर्ज घेतलेले असल्यास त्याचा EMI वेळच्या वेळी भरावा. how to Check Cibil Score

तुमचं सिबिल स्कोर मोफत तपासण्यासाठी क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!