Mukhyamantri Shashwat Krishi Sinchan Yojana: शेतकऱ्यांना शेततळे घेण्यासाठी मिळणार दीड लाख रुपये; अर्ज कसा करायचं? कुणाला भेटालं? वाचा सविस्तर..

Mukhyamantri Shashwat Krishi Sinchan Yojana मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजने अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये वैयक्तिक शेततळे ही योजना राबविण्यात येत असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातल्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने जिल्ह्यांच्या कृषि विभागात अर्ज करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यात पडलेल्या कमी पावसामुळे शेततळ्यात साठवलेले पाणी यांचा वापर खरीप पिके, फळबागांच्या संरक्षित सिंचनाकरिता होतो. सरकारच्या या मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार शेतकऱ्याकडे किमान 0.40 हेक्टर इतकी शेतजमीन असणे गरजेचे आहे. लक्षात ठेवा शेतातील क्षेत्र धारणेस कोणतीही कमाल मर्यादा नाहीये, यापूर्वी शेतकऱ्यांनी मात्र या योजनेत सहभागी होण्यासाठी शासनाच्या मागेल त्याला शेततळे/ सामूहिक शेततळे यासारख्या इतर कोणत्याही अनुदानाचा लाभ घेतलेला नसणे बंधनकारक आहे.

Mukhyamantri Shashwat Krishi Sinchan Yojana

यावर्षी पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे पाणीटंचाईची परिस्थिति पाहता उन्हाळ्यात फळ बाग वाचविण्याकरिता सध्या पाण्याची उपलब्ध असलेले स्त्रोत जसे की, विहीर, बोअर वेल याशिवाय परतीच्या पावसामुळे जमा होणारे पाणी अस्तरीकरणांसोबत या मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेचा (Mukhyamantri Shashwat Krishi Sinchan Yojana) लाभ घेऊन पाण्याचा साठा करणे अत्यंत आवश्यक आहे. मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनातून अर्जदार शेतकऱ्याला अस्तरीकरणांसाठी 75000 आणि शेततळे घेण्यासाठी 75000 असे एकूण दीड लाखाचे अनुदान मिळते.

या शियाय मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनामधून काम पूर्ण झाल्यावर पंधरा दिवसाच्या आत अनुदानाची संपूर्ण रक्कम ही शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा करण्यात येते.

Mukhyamantri Shashwat Krishi Sinchan Yojanaचा प्रमुख उद्देश

मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना मधून संरक्षित सिंचनसाठयातून शेती करण्यासाठी किंवा फळ बागेची निगा राखण्यासाठी पाण्याचा उपयोग करणे हा आहे. यापूर्वी ज्या शेतकऱ्यांनी कोणत्याही शेततळे योजनेचा लाभ घेतलेला नाहीये, राज्यातील अश्या शेतकऱ्यांनी राज्य शासनाच्या महाडीबीटी या अधिकृत पोर्टलवर csc केंद्रामार्फत अथवा वैयक्तिकपणे मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेचा लाभ घ्यावा, तसेच अधिक माहीतीसाठी कृषि सहाय्यक/तालुका कृषि अधिकारी कार्यालय यापैकी कोणाच्याही बरोबर संपर्क करावा.

शेतकाऱ्यांसाठी फायद्याची अशी पाईप लाइन योजनेचा लाभ घेण्यासाठी क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!