औरंगाबादमध्ये महिनाअखेर पेट्रोलची भीषण टंचाई भासणार?; समोर आलं ‘हे’ कारण..

औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात मागील महिन्या पासून पेट्रोलचा पुरवठा कमी होत आहे. मागील महिन्यापासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ न केल्यामुळे ऑईल कंपन्यांना प्रति लिटर 15 ते 20 रूपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे औरंगाबाद शहरासह जिल्ह्याला होणारा पेट्रोल -डिझेलचा पुरवठा कमी करण्यात आला आहे. सध्या 20 ते 25% कमी पेट्रोल मिळत आहे.

पत्रकार परिषदेमध्ये अखिल अब्बास यांनी सांगितले की, ‘ मागील महिनापासून औरंगाबाद जिल्ह्यातील पंप चालकांना नियमित पुरवठा केला जात नसल्यामुळे जिल्ह्यातील अनेक पंपाचा पेट्रोलसाठा संपत आला असून पंप बंद ठेवण्याची वेळ औरंगाबाद जिल्ह्यातील पंपचालकांवर आली आहे. औरंगाबाद महानगर पालिका क्षेत्रात 55 पेट्रोल पंप असून यातील अनेक पंप बंद राहत आहेत.’ तसेच कंपनीकडून महिन्याच्या शेवटी पेट्रोल पुरवठा कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. यामुळे जिल्हावासीयांना पेट्रोल- डिझेल टंचाईचा सामना करावा लागण्याची सुद्धा शक्यता पंप चालकांनी दिली आहे.

अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा

असोसिएशन तर्फे देण्यात आलेल्या निवेदनात पंपचालकांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना ऑइल कंपन्याच्या अधिकाऱ्याबरोबर बैठक घेऊन, जिल्ह्यासाठी पुरवठा चांगला व्हावा. यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली आहे.

पंपाच्या वेळा ठरवाव्या

आणि जर का पुरवठा कमीच होत असेल, तर पंपाच्या वेळापत्रक ठरविण्यात याव्यात किंवा कोणत्या भागात पेट्रोल पंप सुरू ठेवावेत किंवा बंद ठेवावेत याचे नियोजन करण्याची मागणी केली आहे.

Similar Posts