Income Certificate Online Maharashtra | घरबसल्या उत्पन्नाचा दाखला मोबाईलवर असा काढा

Income Certificate Online

Income Certificate Online Maharashtra: उत्पन्नाचा दाखला अर्थातच इन्कम सर्टिफिकेट.. (Income Certificate) उत्पन्नाचा दाखला हे असं एक कागदपत्रं आहे जो राज्य सरकारच्या अंतर्गत काम करणाऱ्या प्राधिकरणाकडून जारी केल्या जातो. केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी उत्पन्नाचा दाखला असणं आवश्यक आहे.

विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपसाठी देखील उत्पन्नाचा दाखला असणं गरजेचं आहे. उत्पन्नाच्या दाखल्यावरती तुमचं वार्षिक उत्पन्न दाखविल्या जाते. हा दाखला अतिशय महत्वाचा आहे. उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाही. घरबसल्या तुम्ही ऑनलाईन उत्पन्नाचा दाखला काढू शकता. उत्पन्नाचा दाखला कसा काढायचा याबाबतची संपूर्ण माहिती जाणून घेऊ या..

Income Certificate Online उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

 • ओळखीचा पुरावा (आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र यापैकी कोणतेही एक)
 • पत्त्याचा पुरावा (पासपोर्ट, रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, वीजबिल, वाहन चालवण्याचा परवाना)
 • जन्माचा दाखला (वय 18 वर्षांपेक्षा कमी असल्यास)
 • शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र (वय 18 वर्षांपेक्षा कमी असल्यास)
 • बोनाफाईड प्रमाणपत्र
 • स्वघोषणापत्र (Income Certificate Documents)
 • तलाठ्याचा उत्पन्नाचा दाखला (ऑनलाईन अपलोड करण्यासाठी)

Income Certificate Online उत्पन्नाचा दाखला असा काढा ऑनलाईन मोबाईलवरून..

 • उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी सर्वप्रथम aaplaesrakar.mahaonline.gov.in या वेबसाईटवर जा.
 • येथे वेबसाईटवर मराठी किंवा इंग्रजी भाषा निवडण्याचा पर्याय आहे. त्यावर तुम्हाला ज्याच्या नावाने दाखला काढायचा त्याच्या नावाने नवीन नोंदणी करावी लागेल. (Income Certificate Maharashtra)
 • तिथे आपला जिल्हा निवडून त्यानंतर ‘ओटीपी’द्वारे आपला मोबाईल नंबर पडताळा.
 • यानंतर, युजरनेम आणि पासवर्ड तयार करा. यापुढे नाव आणि जन्मतारीख टाकून अकाउंट तयार करा. तुमचं अकाउंट तयार होईल. परत तुम्हाला युझरनेम आणि पासवर्ड टाकून करावे लागेल. (Income Certificate Documents in Marathi)
 • लॉग इन झाल्यानंतर डाव्या बाजूला असलेल्या महसूल विभाग निवडा. महसूल विभाग निवडल्यानंतर उपविभाग मध्ये महसूल सेवा निवडावे, तिथे उत्पन्नाचा दाखला पर्याय दिसेल तो निवडून ‘Proceed’ बटणावर क्लिक करा.
 • यानंतर, उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी तूम्हाला उत्पन्न वर्ष निवडावे लागेल 1 किंवा 3 वर्षें.
 • आता अर्जदाराची संपूर्ण माहिती भरा व नंतर आपला व्यवसाय निवडा. त्यानंतर आधार कार्ड नंबर टाका. हे सर्व केल्यानंतर खालील ‘I Agree’ पर्यायावर क्लिक करा.
 • माहिती बरोबर असल्याची खात्री करावी व नंतर आपला आधार कार्डवरील पत्ता तिथे टाका. यानंतर रेशनकार्ड प्रमाणपत्रावरची माहिती भरा. (Income Certificate Online)
 • यानंतर, उत्पन्नाचे प्रमाणपत्र काढण्याचे कारण सांगायचे कारण काय आहे ते सांगा ‌ तिथे शेती व शैक्षणिक असे पर्याय दिसतील. उत्पन्नाचे विविध साधने 3 वर्षाच्या उत्पन्नासहीत नमूद करा. त्यानंतर समाविष्ट करावे या पर्यायावर वर क्लिक करा. (Income Certificate Form)
 • आता वरील दिलेले आवश्यक अपलोड करा.
 • फोटो (160 Pixel*200 Pixel) (5kb to 20kb Photo)
 • ओळखीचा पुरावा (75 to 100kb)
 • वयाचा पुरावा (18 वर्षाखालील व्यक्तीसाठी फक्त)
 • उत्पनाचा पुरावा (कोणतेही एक)
 • तलाठ्याचा उत्पन्नाचा दाखला
 • स्वघोषणापत्र डाऊनलोड करून विचारलेली योग्य ती माहिती भरून अपलोड करा.
 • आता अपलोड डॉक्युमेंट्स वर क्लिक करून 33 रुपयांचे पेमेंट करा. (Income Certificate Download)
 • तुमचा उत्पन्नाचा दाखल्याचा अर्ज यशस्वी होईल. तुम्हाला 3 दिवसांत उत्पन्नाचा दाखला ई-मेल वर मिळून जाईल.

हे देखील वाचा-


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!