शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, एका मिस्ड काॅलवर मिळणार कर्ज, ‘या’ बॅंकेची भन्नाट योजना..

आता शेतकऱ्यांना फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS केल्यावर झटपट कर्ज (Agriculture Loan) मिळणार आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी ही योजना सुरू केली आहे.

बँकांनीही शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जाची प्रक्रिया सोपी केली आहे. पंजाब नॅशनल बँकेने शेतकऱ्यांना मिस्ड कॉलवरच कर्ज उपलब्ध करून देण्याचा दावा केला आहे. पीएनबीने (PNB BANK) आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जाच्या अर्जाशी संबंधित संपूर्ण माहिती दिली आहे. कर्जाच्या अर्जाबाबत बँकेने म्हटलं की, कृषी कर्जासाठी अर्ज कसा करावा? याची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे मिळणार आहे. Agriculture Loan

शेतकऱ्यांनो अशा प्रकारे मिळवा कर्ज

देशातील शेतकऱ्यांना अतिशय सोप्या पद्धतीने कर्ज देण्याची ऑफर पीएनबीने दिली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना अत्यंत सोप्या आणि माफक अटींद्वारे शेतीसाठी कर्ज घेता येईल. कर्ज घेण्यासाठीची खालीलप्रमाणे आहे. Bank Loan

● 56070 या नंबरवर ‘Loan’ असे लिहून SMS करा.
18001805555 वर मिस कॉल द्या.
18001802222 वर कॉल सेंटरशी संपर्क साधा.
● नेट बँकिंग वेबसाइट http://netpnb.com द्वारे अर्ज करा.
● PNB One द्वारे अर्ज करा.

शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरु केल्या आहे अनेक योजना

केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली आहे.. ज्या-अंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये सरकारकडून दिले जातात.. तसेच थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर तीन हप्त्यांमध्ये ही रक्कम पाठवली जाते.. Bank Loan Agriculture Loan

त्याच प्रमाणे किसान क्रेडिट कार्ड योजनेंतर्गत सरकार शेतकऱ्यांना अगदी नाममात्र व्याजावर 3 लाख रुपये देते.. याची खास बाब अशी कि, शेतकऱ्याला या कर्जाचे व्याज वर्षातून एकदाच भरावे लागते.. तसेच मुद्दल आणि व्याज दोन्ही वर्षातून एकदा जमा करावे लागतात. . Bank Loan

यासोबतच शेतीचा विस्तार करण्याकरिता आणि पाण्याची बचत करण्यासाठी आणि सिंचनाच्या आधुनिक तंत्राचा अवलंब करण्यासाठी कृषी सिंचाई योजनेंतर्गत शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जाते आहे.. Agriculture Loan शेतकऱ्यांना या योजनेद्वारे ठिबक आणि तुषार सिंचन तंत्रावर अनुदान दिले जाते.. या योजनेच्या अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांना अधिकृत वेबसाइट https://pmksy.gov.in/ ला भेट द्यावी लागेल. Bank Loan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!