पाच वर्षीय मुलीवर दुष्कर्म केल्या प्रकरणी महिलांच्या गटाने पुरुषाला झाडाला बांधून मारलं; मारहाणीत आरोपीचा मृत्यू.

त्रिपुराच्‍या धलाई जिल्‍ह्यात ५ वर्षांच्या मुलीवर ब. ला. त्का. र करणाऱ्या आरोपीला महिलांच्या एका समूहाने झाडाला बांधले व मारून मारून ठार केल्याचे सांगितले जात आहे. मयत आरोपी नुकताच एका खुनाच्या गुन्ह्यात 8 वर्षांची शिक्षा भोगून तुरुंगातून बाहेर आला होता. ही घटना 15 मार्च 2022 (मंगळवार) ची आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मृत व्यक्तीचे वय 46 वर्षे आहे. 5 वर्षांच्या मुलीवर जंगलात ब.ला.त्का.र केल्याचा आरोप त्याच्यावर होता. मुलगी रात्री आईसोबत धार्मिक कार्यक्रमाला गेली होती. तेथून आरोपीने तिला उचलून जंगलात नेले आणि तिच्यावर दूष्कर्म केले आणि मुलीला जागीच सोडून दिले, मुलीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून स्थानिक लोक घटनास्थळी पोहोचले व त्यांनी मुलीला रुग्णालयात दाखल केले.

ब. ला. त्का. राच्या आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी पीडितेच्या कुटुंबीयांनी गंडाचेरा-अमरपूर महामार्ग रोखून धरला होता. यानंतर ब.ला.त्का.र करणाऱ्या आरोपीला जवळच्या गावातील स्थानिक महिलांनी पकडले. त्याला झाडाला बांधले व इतके मारले की य मारहाणीत आरोपीचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मारहाणीनंतर त्याला रस्त्याच्या कडेला सोडून देण्यात आले. एका वृत्तानुसार, मारहाणीप्रकरणी आतापर्यंत 5 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. त्यानुसार पोलिस तपास करत आहेत.

Similar Posts