औरंगाबादमध्ये किरकोळ वादातून मित्राची हत्या.! व्हिडिओ व्हायरल..

औरंगाबाद शहरातील जिन्सी स्टेशन परिसरातील बयाजीपुरा परिसरमध्ये रविवारी रात्री उशिरा अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वादातून दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी झाली.

यामध्ये एका तरुणाने रागाच्या भरात दुसऱ्या तरुणाचा सिकंदर हॉलसमोर चाकूने वार करून निर्घृण खून केल्याची घटना रात्री उशिरा उघडकीस आली. या घटनेत चाकूने वार केलेला मारेकरीही गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जिन्सी स्टेशनचे पीआय व्यंकटेश केंद्रे यांनी सांगितले की, शहरातील बायजीपुरा येथील संजय नगर येथे राहणारा मारेकरी हैदर खान उर्फ शारेख जाफर खान आणि मृत शेख शाहरुख शेख अन्वर रा. इंदिरानगर बायजीपुरा यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. या वादातून रविवारी रात्री 11.30 ते 12 वाजेच्या दरम्यान दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. या वादात दोघेही एकमेकांवर तुटून पडले.

यानंतर मारेकरी हैदर खानने शाहरुखच्या छातीवर, पोटावर आणि चाकूने अनेक वार केले. चाकूच्या अनेक वारांमुळे शाहरुख रक्तबंबाळ झाला. यानंतर त्याचा जागीच मृत्यू झाला. हत्या करत असताना मारेकरी हैदर खान सुद्धा गंभीर जखमी झाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.. मृत व आरोपी तरुण हे दोघंही रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे.

व्हिडिओ व्हायरल..

या घटनेनंतर बयाजीपुरामध्ये बराच वेळ तणावाचे वातावरण होते. मृताचे मामा जावेद खालेद पठाण रा. इंदिरानगर बायजीपुरा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी शाहरुख जाफर खान याच्याविरुद्ध सोमवारी सकाळी कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीआय मयेकर करीत आहेत.

Similar Posts