कुटुंब नियोजन किटसह वाटप केले जात आहे रबराचे लिं.ग, आरोग्य विभागाचा प्रताप..

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी विचारले, ठाकरे सरकार वेडे झाले आहे का?

बुलढाणा: ( ABDnews) लोकसंख्या नियंत्रणासाठी राज्य सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. राज्य सरकार (महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाची यात प्रमुख भूमिका आहे. या विभागाकडून कुटुंब नियोजन उपक्रमही राबविण्यात येत आहेत. मात्र, राज्य सरकारने कुटुंबासाठी समुपदेशन किटमध्ये रबराचे लिं.ग उपलब्ध करून दिल्याने सरकारच्या या निर्णयामुळे आशा वर्कर्समध्ये नाराजी पसरली आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. चित्रा वाघ यांनी ट्विट करून राज्य सरकारवर टीका केली आहे. आशा सेविका गावोगावी जाऊन कुटुंब नियोजन आणि महिलांचे समुपदेशन करतात मात्र, राज्याकडून देण्यात येणाऱ्या कुटुंब नियोजन किटमध्ये रबर लिं.गची तरतूद करण्यात आली आहे. ते रबर लिं.ग घेऊन आशा कार्यकर्त्या गावोगावी कशा फिरू शकतात?, असा प्रश्न विचारला आहे. यावर बुलढाण्याचे पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचे अजब कारभार समोर आला आहे. कुटुंब नियोजनाशी संबंधित बाबी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी येथे कुटुंब नियोजन किटसह रबर लिं.गाचे वाटप करण्यात आले आहे. एवढेच नाही तर राज्यातील आशा वर्कर्सना ते लिं.ग लोकांसमोर दाखवून जनजागृती करा, म्हणजेच हे रबर जें.ड.र लोकांना दाखवून कुटुंब नियोजनाचा संदेश द्या आणि लोकांना जागरूक करा, असे सांगितले आहे.

यावर महाराष्ट्र भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी ट्विट करून आपली प्रतिक्रिया दिली असून ठाकरे सरकारचे डोके जागेवर आहे का? त्यांनी या कामासाठी संबंधित लोकांवर आयपीसी कलम 354 (महिलेच्या सन्माना विरुद्ध घृणास्पद काम ) कारवाई करण्याची मागणी केली आहे.

चित्रा वाघ यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाल्या, ‘हा केवळ त्या आशा कार्यकर्त्यांच्या मान-सन्मानाशी खेळत नाही, तर प्रत्येक महिलेचा संताप वाढवणारी ही कृती आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करून आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टॅग केले. त्यावर त्यांनी टीका केली आहे. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आशा वर्कर्सना प्रात्यक्षिकासाठी रबर लिं.ग देण्यात आले आहेत. यावर ते कॅमेरासमोर बोलायला तयार नाहीत. हे रबरी लिं.ग घेऊन ग्रामीण भागातील महिलांसमोर कसे जायचे? या वादात आशा वर्कर संतप्त झाल्या आहेत. या संदर्भात आशा सेविकांशी बोलण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांनी सरकारविरोधात बोलण्यास नकार दिला. सरकारच्या या अजब निर्णयावर महिला संताप व्यक्त करत आहेत.

तर आरोग्य विभागाने दिलेल्या या किट जनजागृतीसाठी दिल्या असल्याचे स्पष्टीकरण वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलं आहे. यामुळे लैंगिकते संबंधीत आजार सुद्धा कमी होतील अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र सांगळे यांनी दिली आहे.

Similar Posts