चीनमध्ये भीषण अपघात, प्रवासी विमान कोसळून १३३ जणांसह संपूर्ण परिसर आगीच्या भक्ष्यस्थानी.

चीनमध्ये सोमवारी एक मोठी दुर्घटना घडली आहे. एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, येथे एक प्रवासी विमान कोसळले असून त्यात १३३ लोक होते.

ही घटना देशाच्या नैऋत्य भागात घडली. या अपघातात किती जण जखमी झाले आहेत, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. चीनच्या अधिकृत चॅनल सीसीटीव्हीने वृत्त दिले आहे की बोइंग 737 विमान गुआंग्शी प्रदेशातील वुझोउ शहराजवळील ग्रामीण भागात कोसळले. विमान कोसळताच आगीचे मोठे लोट दिसून आले. घटनास्थळी बचाव पथके पाठवण्यात आल्याचे चिनी मीडिया वाहिनीने सांगितले.

“चायना ईस्टन एअरलाइन्सचे 133 लोक घेऊन जाणारे बोईंग 737 प्रवासी विमान गुआंग्शीमधील टेंग काउंटीच्या वुझोउ येथे क्रॅश झाले आणि पर्वतांमध्ये आग लागली,” असे ग्वांगशी आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने एका निवेदनात म्हटले आहे. येथे बचाव पथके पाठवण्यात आली असून त्यांच्याशी संपर्क साधला जात आहे. मृतांच्या संख्येबाबत कोणतीही माहिती नाही. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये झाडांमधून पांढरा धूर निघताना दिसत आहे.

विमानाचे मोठे तुकडे सापडल्याचा दावा

असेच अनेक व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यामध्ये संपूर्ण परिसर आगीच्या भक्ष्यस्थानी दिसत आहे. ट्विटरवर शेअर केलेल्या छायाचित्रांमध्ये स्थानिक लोक या भागात विमानाचे मोठे तुकडे सापडल्याचा दावा करत आहेत. एव्हिएशन सेफ्टी नेटवर्कने ट्विट केले की, “आम्ही चीनच्या ईस्टर्न एअरलाइन्सच्या उड्डाण MU5735 बोइंग 737-89P (B-1791) च्या कुनमिंग ते ग्वांगझू या मार्गावर संभाव्य अपघाताबाबत अनेक अहवाल पाहत आहोत.”

विमान हजारो फूट उंचीवरून पडले

विमानाच्या उड्डाण डेटावरून काही मिनिटांत विमान हजारो फुटांवरून जमिनीवर कोसळले, त्यामुळे क्रूला काहीही करण्यास फार कमी वेळ मिळाला. फ्लाइट ट्रॅकिंग (0622 GMT) दुपारी 2:22 वाजता 3225 फूट उंचीवर 376 नॉट्सच्या वेगाने संपले. तासाभराने ते उतरणार होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!