अरे देवा..! कंडोमचा होतोय भलत्याच कामासाठी वापर; तरुणांमध्ये नशेचा हा ट्रेंड थक्क करणार…!
सामान्यतः असुरक्षित यौन संबंध टाळण्यासाठी कंडोमचा वापर केला जातो, पण पश्चिम बंगालमध्ये ज्या पद्धतीने कंडोमचा वापर केला जात आहे, ते जाणून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. बंगालच्या दुर्गापूरमध्ये अचानक कंडोमची मागणी वाढली तेव्हा सगळेच चक्रावून गेले. येथे युवक नशेसाठी कंडोमचा वापर करत आहेत. अचानक कंडोमची मागणी इतकी वाढली की त्याचा तुटवडा निर्माण झाला. मागणी वाढण्याचे कारण समोर आल्यावर कोणाचाही विश्वास बसत नाही.
पश्चिम बंगालमधील दुर्गापूरमध्ये तरुणांमध्ये अंमली पदार्थांच्या व्यसनाचा एक विचित्र ट्रेंड पाहायला मिळत आहे. तरुणाई नशेसाठी कंडोमचा वापर करत असून त्यांना या नशेची चटक लागली आहे. इथे परिस्थिती अशी झाली आहे की दुकानांमध्ये कंडोमचा तुटवडा आहे. नशेसाठी तरुणांमध्ये फ्लेवर्ड कंडोमची मागणी वाढल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. दुर्गापूर सिटी सेंटर, विधान नगर, बेनाचिती आणि मुचीपारा यासह अनेक भागात फ्लेवर्ड कंडोम मिळत नाहीत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पूर्वीपेक्षा कंडोमची मागणी इतकी का वाढली आहे हे दुकानदारांनाही समजत नसल्यामुळे एका दुकानदाराने एक तरुण मुलगा कंडोम घेण्यासाठी आला तेव्हा त्याने त्याला विचारले असता कारण खरं कारण समोर आले आहे..
नशेसाठी घेत आहे कंडोमची वाफ..!
कंडोमची नशा करणाऱ्या एका तरुणाने दुकानदाराला सांगितले की, नशा करण्यासाठी तो कंडोम पाण्यामध्ये उकळून त्या पाण्याची वाफ घेतो, आणि त्याच्या ओळखीचे अनेक तरुण ड्रग्जऐवजी नशा येण्यासाठी य पाढतीचाच वापर करत असल्याचेही त्याने सांगितले. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिननेही या संदर्भात संशोधन प्रकाशित केले आहे.
जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार कंडोममध्ये सुगंधी संयुगे असतात. हे सुगंधी संयुगे वितळल्यानंतर अल्कोहोल तयार करतात. याचे व्यसन कोणालाही होऊ शकते.
कंडोमला उकळून पित आहे ते पाणी!
या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात असे सुद्धा म्हटले आहे की, कंडोम गरम उकळत्या पाण्यात जास्त काळ ठेवल्यास त्यात असलेली सुगंधी संयुगे तुटून पाण्यात मिसळतात आणि हे पाणी एक प्रकारचा अल्कोहोल बनते. या पाण्याची वाफ तरुण श्वास घेत असल्याचे बोलले जात आहे. मात्र, काही तरुण हे पाणी पीत असल्याचेही अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये बोलले जात आहे.
त्याचप्रमाणे नायजेरियात टूथपेस्ट आणि फुटवेअरच्या मागणीत सुद्धा सहा पटीने वाढ झाली होती, आणि त्याचा वापर सुद्धा नशेसाठी करण्यात येत होता..