राज्यातील मुलींना मिळणार मोफत सायकल, शासनाचा निर्णय जाहीर..

राज्यातील 8वी ते 12वीचे शिक्षण घेत असलेल्या मुलींना सायकल खरेदी करण्यासाठी मानव विकास कार्यक्रम अंतर्गत अनुदान दिले जाणार आहे.

काय आहे सायकल वाटप योजनेची वैशिष्ट्ये
Cycle Vatap Yojana Features

● मोफत सायकल वाटप योजना ही महाराष्ट्र शासनाकडून सुरु करण्यात आलेली आहे.
● फक्त गरजू मुलींनाच इयत्ता 8वी ते 12वी पर्यंतच्या शालेय शिक्षणामधील कोणत्याही टप्प्यामध्ये सायकल खरेदी करण्यासाठी स्वतंत्रता राहील.
● सदरील मुलीच्या कुटुंबाला सायकल घेण्याकरिता कोणावरहि अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही अथवा कोणाकडून कर्ज घेऊन सायकल खरेदी करण्याची आवश्यकता भासणार नाही.
● या योजनेअंतर्गत सायकल खरेदीसाठी अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी आहे, ज्यामुळे मुलींना या योजनेचा लाभ मिळवण्याकरीता कोणत्याही सरकारी कार्यालयाच्या चकरा मारण्याची आवश्यकताच भासणार नाही.
● मोफत सायकल वाटप योजनेअंतर्गत मिळणारी लाभाची राशी DBT प्रणाली च्या सहाय्याने लाभार्थी मुलीच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते.
● या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक लाभामुळे गरजू मुलींना सायकल खरेदी करून शिक्षण पूर्ण करण्यास व भविष्यात चांगली नोकरी मिळवण्यास किंवा स्वतःचा रोजगार उभा करून इतर बेरोजगार नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करू शकतील.
● शिवाय या योजनेमुळे मुली आत्मनिर्भर बनतील.

मोफत सायकल वाटप योजनेचे फायदे

● सायकल वाटप योजनेमुळे लाभार्थी मुलींना महाराष्ट्र सरकारकडून सायकल खरेदी करण्याकरीता पाच हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे.
● या योजनेमुळे मुलींना शाळेमध्ये जाण्यासाठी प्रोत्साहन मिळून त्या आपले शिक्षण पूर्ण करू शकणार आहे.
● राज्य सरकारच्या या योजनेमुळे गरजू मुलींना घरामधून शाळेत आणि शाळेमधून घरी जण्या येण्यासाठी पायी चालत जावे लागणार नाही.
● वेळेची बचत होईल
● गरजू मुलींना शिक्षण पूर्ण करण्यास मदत होईल.

काय आहे पात्रता

● अनुदान प्राप्त करणारी मुलगी ही इयत्ता 8वी ते 12वी पर्यंतचे शिक्षण घेत असावी.
● मुलीच्या शाळापासून ते घरापर्यंतचे अंतर 5 किलोमिटर पेक्षा जास्त असावे.
● सदरील अनुदानाचा लाभ घेणारी मुलगी ही सायकलसाठी गरजू असावी.
● महाराष्ट्र राज्याबाहेरील मुलींना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
● लाभार्थी गरजू मुलीला इयत्ता 8वी ते 12वी या 4 वर्षांत सायकल खरेदी करण्यासाठी एकदाच अनुदान मिळेल.
● सदरील मुलगी ही शासकीय, जिल्हा परिषद, किंवा शासकिय अनुदानित शाळेमध्ये शिक्षण घेत असणे अनिवार्य आहे.
● सदरील गरजवंत कन्या ही गावे / वाड्या /वस्त्या / तांडे / पाडे हे डोंगराळ व अतिदुर्गम भागातली असल्यास तिला प्रथम प्राधान्य दिले जाईल .

कसे असणार आर्थिक लाभाचे स्वरुप

1. पहिल्या टप्यात डी.बी.टी (DBT) द्वारे गरजवंत मुलींच्या खात्यामध्ये 3500/- रुपये आगाऊ रक्कम जमा केली जाईल.
2. दुसऱ्या टप्यामध्ये मुलींने सायकल खरेदी केल्यावर खरेदीची पावती जोडुन कागतपत्रे सादर केल्यावर उरलेले 1500/- मुलीच्या खात्यात डी.बी.टी. (DBT) प्रणाली द्वारे वर्ग केले जाणार आहे.

सायकल वाटप योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या शाळा
Cycle Vatap Yojana Beneficiary Schools

● शासकीय शाळा
● जिल्हा परिषद शाळा
● शासकीय अनुदानित शाळा
● याशिवाय ज्या अनुदानित व शासकीय आश्रम शाळेमधील मुलींना स्कॉलर प्रवेश दिला जातो आणि ज्या मुलींना रोज घरापासून ये जा करावी लागते अशा शाळेच्या मुलींना हि योजना लागू करण्यात येणार आहे.

या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
Cycle Vatap Yojana Documents

● आधार कार्ड
● राशन कार्ड
● निवास प्रमाण पत्र
● पासपोर्ट साईज फोटो
● मोबाईल नंबर
● ई-मेल आयडी
● बँक खाते
● विद्यार्थिनी इयत्ता 8वी ते 12वी मध्ये शिकत असल्याचे शालेय प्रमाणपत्र
● सायकल खरेदी केलेली पावती.

या योजनेसाठी अर्ज कसा करालं ..

या योजनेचा लाभ मिळवण्याकरीता विद्यार्थिनीं ना स्वतःच्या शाळेत जाऊन शालेच्या कार्यालयामधून अथवा प्राचार्यांकडून या योजनेचा अर्ज घेऊन अर्जामध्ये विचारलेली माहिती आणि आवश्यक कागदपत्रे जोडून सदर अर्ज शाळेत जमा करावा.

अथवा

गरजू मुलींना स्वतःच्या जिल्ह्यामधील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन नियोजन विभागाला भेट द्यावी आणि या योजनेचा अर्ज घ्यावा लागेल आणि अर्जात विचारलेली सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज सदर कार्यालयात जमा करावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!