TAF COP Portal | तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहे, असे पहा मोबाईलवर.

TAF-COP Portal
TAF-COP Portal

TAF COP Portal: मोबाईलमध्ये सिम कार्ड असल्याशिवाय कोणतीच कामे करता येत नाही. ना तुम्हाला कॉलिंग व इंटरनेट वापरता येईल. म्हणजेच तुमच्याकडे स्मार्टफोन असून देखील काही उपयोग नाही हे सर्वांनाच माहीत आहे. तसेच ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये गेल्या काही महिन्यात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे.

अनेकदा तुमच्या ओळखपत्रांचा वापर इतर व्यक्ती चुकीच्या कामासाठी देखील करण्याची शक्यता असते. तसेच, तुमच्या तुमच्या ओळखपत्राचा वापर करून सिम कार्ड देखील घेऊ शकतात‌. या मोबाइल नंबरचा वापर चुकीच्या कामासाठी केल्यास याचा मोठा फटका तुम्हाला बसू शकतो. (How to Check Aadhar Registered Mobile Number)

याशिवाय, तुमच्या या मोबाईल नंबरचा वापर करून गुन्हेगार बँक खाते देखील रिकामे करू शकतात. आधार कार्डच्या मदतीने नवीन सिम कार्ड घेणे हे सोपे झाले आहे. यामुळे तुमच्या नावावर कोणीही सिम कार्ड घेऊ शकेल. असे अनेकवेळा होते की, तुमच्या नावावर कोणीही सिम कार्ड घेतलेले असते परंतु, तुम्हाला माहित नसते. (taf cop portal)

तुम्ही वापरत नसलेले सिम किंवा हरवलेले सिम लगेच बंद करणे गरजेचे आहे. तुम्हाला असे दिसून आले की, तुमची माहिती वापरून कोणी सिमकार्ड विकत घेतले आहे आणि ते वापरत आहे. आता तुम्हाला या गोष्टीची काळजी करायची गरज नाही. तुम्ही आता त्याची माहिती ऑनलाईन स्वरूपात मिळवू शकता. (How to find Aadhar Registered Mobile Number)

अनेकदा असे होते की, गुन्हेगार तुमच्या आधार कार्डवरील फोटो, नाव आणि पत्ता बदलून कर्जासाठी, बँक खाते उघडण्यासाठी करू शकतात. या कामासाठी आधार कार्ड पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्सचा उपयोग केला जाऊ शकतो. तुमच्यावर किती सिम कार्ड आहेत हे जाणून घेण्यासाठी व तुम्ही वापरत नसलेला नंबर ब्लॉक करण्यासाठी एक पोर्टल सुरू करण्यात आले आहे. चला तर याबाबतची स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घेऊ या..

तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहे असे पहा..
सर्वप्रथम https://tafcop.dgtelecom.gov.in/alert.php या पोर्टलवर जा.
यानंतर, तुमचा मोबाईल नंबर टाका आणि पोर्टलवर OTP टाका.
त्यानंतर तुम्हाला तुमच्या नावावर वर असलेले सर्व मोबाईल नंबर दिसतील.
येथे तुम्ही वापरत नसलेल्या मोबाईल नंबरला ब्लॉक देखील करू शकता.


हे देखील वाचा –


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!