शिक्षण संस्थाचालकांची अशीही ‘शाळा’: औरंगाबादेत सहा अनधिकृत शाळांवर शिक्षण विभागाने ठोठावला प्रत्येकी एक लाखाचा दंड..!

संभाजीनगर (औरंगाबाद) : मान्यता काढून घेतलेली असतांनासुद्धा अनधिकृतपणे शाळा सुरुच ठेवून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळ करणाऱ्या शिक्षण संस्था चालकांना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दणका दिला आहे. अनधिकृतपणे सुरु असलेल्या सहा शाळांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून, आता सूचना देऊनही पुढे शाळा सुरु ठेवल्यास दिवसाकाठी प्रत्येकी 10000 रुपयांचा दंड ठोठावण्याची कारवाई करण्यात येणार असल्याची जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांनी ही माहिती दिली.

▪️शाळा सुरु करताना राज्य मंडळाशी संलग्न शाळांना राज्य सरकारचे परवानगी आदेश घ्यावे. लागतात. तर सीबीएसई, आयसीएसई, आयबी, आयसीजीएसई, सीआयई संलग्नित शाळांना राज्य शासनाचे ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते. मात्र, अशा प्रमाणपत्रांशिवाय काही शाळा सुरु असल्याचे शिक्षण विभागाच्या निदर्शनास आले होते. त्यानुसार शहरात सतरा शाळांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी सहा शाळांना दंड ठोठावण्यात आला.

▪️ या अनधिकृत शाळांवर झाली कारवाई..👇🏻

● प्राथमिक शाळा: फ्युचर स्टार इंटरनॅशल स्कुल (बीड बायपास रोड, सातारा परिसर),
● चिल्ड्रन पार्क इंटरनॅशनल स्कुल, (देवळाई परिसर, बीड बायपास रोड),
● सेंट अल्फान्सो स्कूल (गट नं. २१, वडगाव कोल्हाटी, वाळूज परिसर)
● स्व. लक्ष्मणराव डांगे किड्स इंग्लिश स्कुल (एन २, सिडको, औरंगाबाद),
● गौताळा व्हॅली स्कुल (कन्नड),
● कृष्णा इंटरनॅशनल स्कुल (गट नं. ११७, हिवरखेडा, गौताळा, कन्नड)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!