बारावी नंतरचे वैद्यकीय क्षेत्रातील लोकप्रिय कोर्स, त्यांचा कालावधी आणि खर्च..

Medical Field Courses After 12th: हेल्थकेअर क्षेत्र हे झपाट्याने वाढणारे क्षेत्र आहे आणि कोरोना व्हायरस सारख्या महामारीनंतर या क्षेत्रातील तज्ञ कर्मचाऱ्यांची मागणी आणखी वाढली आहे. वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित अभ्यासक्रमांची मागणी दरवर्षी वाढत आहे. येथे आम्ही तुम्हाला त्या लोकप्रिय अभ्यासक्रमांची माहिती देत आहोत जे तुम्ही 12वी नंतर करू शकता.

MBBS – या कोर्सला सर्वाधिक मागणी असून, या अभ्यासक्रमात औषध आणि शस्त्रक्रिया या विषयातील पदवी दिली जाते. एमबीबीएस अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी NEET परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम आहे आणि NEET परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, यशस्वी अर्जदारांना देशातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळतो.

BAMS– हा देखील वैद्यकीय अभ्यासक्रम आहे, परंतु या अभ्यासक्रमात प्रामुख्याने आयुर्वेदिक औषधांचा अभ्यास केला जातो. हा देखील पाच वर्षांचा कोर्स आहे ज्यामध्ये एक वर्षाची इंटर्नशिप आवश्यक आहे.

BHMS– बॅचलर ऑफ होमिओपॅथी मेडिसिन अँड सर्जरी कोर्स 5.5 वर्षे कालावधीचा आहे, ज्यामध्ये एक वर्षाची इंटर्नशिप आवश्यक आहे. बारावीनंतर या अभ्यासक्रमासाठी अर्ज करता येतो. होमिओपॅथी कोर्स केल्यानंतर तुम्ही स्वतःचे क्लिनिक उघडू शकता.

BDS – बॅचलर ऑफ डेंटल सर्जरीच्या कोर्सलाही खूप मागणी आहे, हा कोर्सही 5 वर्षांचा आहे. या अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला NEET परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल. हा कोर्स डेंटल कौन्सिल ऑफ इंडियाने आयोजित केला आहे.

B.VSc– हा देखील 5 वर्षांचा कोर्स आहे ज्यामध्ये प्राण्यांची औषधे आणि त्यांच्याशी संबंधित रोगांचा अभ्यास केला जातो. B.VSc कोर्स केल्यानंतर तुम्ही तुमचा स्वतःचा प्राणी चिकित्सालय उघडू शकता.

याशिवाय, वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित अनेक अभ्यासक्रम आहेत ज्यासाठी NEET परीक्षा आवश्यक नाही. खाली आम्ही अशा अभ्यासक्रमांची यादी देत आहोत.

● बैचलर ऑफ रेस्पायरेटरी थेरेपी (Bachelor of Respiratory Therapy)
● बैचलर इन साइकॉलजी (Bachelor in Psychology)
● बैचलर ऑफ साइंस इन बायोटेक्नोलॉजी (Bachelor of Science in Biotechnology)
● बैचलर ऑफ ऑक्यूपेशनल थेरेपी (Bachelor of Occupational Therapy)
● बीटेक इन बायोमेडिकल इंजीनियरिंग (B.Tech in Biomedical Engineering)
● बैचलर ऑफ साइंस इन माइक्रोबायोलॉजी (Bachelor of Science in Microbiology)
● बैचलर ऑफ साइंस इन कार्डिएक टेक्नोलॉजी (Bachelor of Science in Cardiac Technology)

बारावी सायन्स नंतर वैद्यकीय अभ्यासक्रमाचा कालावधी आणि त्यांचा खर्च..

● MBBS- 5.5 वर्षे रु. 50 हजार ते 50 लाख
● BDS – 5 वर्षे रु. 10 हजार ते 7 लाख
● B.Sc Nursing – 4 वर्षे रु. 50 हजार ते 1.5 लाख
● GNM Nursing – 3 वर्षे रु. 50 k ते 75 K
● B. pharmacy – 4 वर्षे रु. 60 हजार ते 1.25 लाख
● फार्म. डी (form. D) – 6 वर्षे रु. 1.2 लाख ते 2 लाख

● बॅचलर ऑफ फिजिओथेरपी (Bachelor of Physiotherapy) – 4.5 वर्षे रु. 60 हजार ते 1.25 लाख
● B.Sc ऑक्युपेशनल थेरपी (occupational therapy) – 4.5 वर्षे 60 हजार ते 1.25 लाख रुपये
● B.Sc स्पीच-लँग्वेज पॅथॉलॉजी (speech-language pathology) – 4 वर्षे 60 हजार ते 1.25 लाख
● वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान (medical laboratory technology) – 4 वर्षे रु. 60 K ते 1.25 लाख
● बॅचलर ऑफ ऑप्टोमेट्री Bachelor of Optometry)- 4 वर्षे रु. 60 K ते 1.25 लाख

● B.Sc रेस्पिरेटरी थेरपी (respiratory therapy)- 4 वर्षे रु. 60 K ते 1.25 लाख
● मेडिकल इमेजिंग टेक्नॉलॉजी medical imaging technology) – 4 वर्षे रु. 60 K ते 1.25 लाख
● B.Sc ऍनेस्थेसिया तंत्रज्ञान (Anesthesiology) – 3.5 वर्षे रु. 60 K ते 1.25 लाख
● वैद्यकीय रेडिओथेरपी तंत्रज्ञान (medical radiotherapy)- 4 वर्षे रु. 60 K ते 1.25 लाख
● B.Sc. हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी तंत्रज्ञान(cardiology) – 4 वर्षे रु. 1.2 लाख ते 2 लाख
● B.Sc रेनल डायलिसिस तंत्रज्ञान (renal dialysis technology)- 4 वर्षे रु. 60 K ते 1.25 लाख

● B.Sc. परफ्युजन टेक्नॉलॉजी Perfusion Technology) – 4 वर्षे रु. 1.2 लाख ते 2 लाख
● आरोग्य माहिती प्रशासन(health care administration) – 3 वर्षे रु. 60 हजार ते 1.25 लाख
● आयुर्वेद (Ayurveda)- 5.5 वर्षे रु. 1.2 लाख ते 3 लाख
● होमिओपॅथी (homeopathy) 5.5 वर्षे रु. 1.2 लाख ते 2 लाख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!