Kotak Kanya Scholarship 2022: बारावी उत्तीर्ण मुलींना मिळणार 1.5 लाख रुपये प्रतिवर्ष स्कॉलरशिप, असा करा ऑनलाईन अर्ज..

Kotak Kanya Scholarship 2022: बारावीनंतर गुणवान विद्यार्थ्‍यांना प्रोत्साहन मिळावे, शिक्षण घेताना त्यांच्यासमोर आर्थिक अडचण उभी राहू नये, यासाठी त्यांना कोटक महिंद्रा कंपनीकडून मदतीचा हात दिला जात आहे. अशा मुलींसाठी कोटक महिंद्रा कंपनीने स्कॉलरशिप सुरू केलेली आहे. त्यामुळे या मुलींचे उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण होईल.

Kotak Kanya Scholarship

कोटक एज्युकेशन फाउंडेशन सोबत कोटक महिंद्रा समूहाच्या कंपन्यांच्या शिक्षण आणि उपजीविकेवरील सहयोगी CSR यांच्या अंतर्गत कोटक कन्या शिष्यवृत्ती राबविण्यात येत आहे. कोटक कन्या शिष्यवृत्ती समाजातील वंचित घटकातील 12वी उत्तीर्ण असलेल्या मुलींना पुढील उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळेल.

कोटक कन्या शिष्यवृत्ती मार्फत बारावीनंतर मान्यताप्राप्त संस्थेतून (NAAC/NIRF) व्यावसायिक पदवी अभ्यासक्रम करणाऱ्या मुलींना त्यांची पदवी पूर्ण होईपर्यंत शैक्षणिक खर्च केल्या जाईल. व्यावसायिक अभ्यासक्रमांत अभियांत्रिकी, एमबीबीएस, आर्किटेक्चर, डिझाईन, एकात्मिक एलएलबी या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते.

Kotak Kanya Scholarship पात्रता

संपूर्ण भारतातील मुलींना कोटक कन्या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येईल.
अभियांत्रिकी, एमबीबीएस, आर्किटेक्चर, डिझाईन, एकात्मिक एलएलबी इत्यादी अभ्यासक्रमांसारख्या व्यावसायिक शैक्षणिक व्यवसायांसाठी नामांकित संस्थांमधून (NAAC/NIRF) प्रथम वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमात मिळवलेल्या गुणवंत मुलींना या स्कॉलरशिपचा लाभ घेता येईल.

बारावीमध्ये 85 टक्के किंवा त्याहून अधिक गुण किंवा समतुल्य CGPA मिळवलेले असावे.
अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 3,20,000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी असणं गरजेचं आहे.
कोटक महिंद्रा ग्रुप, कोटक एज्युकेशन फाउंडेशन आणि Buddy4Study मधील कर्मचाऱ्यांचे मुली कोटक कन्या शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ शकत नाही. (Kotak Kanya Scholarship Eligibilty)

Kotak Kanya Scholarshipचे फायदे

मुलींचे व्यावसायिक पदवी अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत प्रतिवर्षी 1.50 लाख रुपये दिल्या जातात. ही रक्कम फक्त शिक्षणाच्या खर्चासाठी वापरता येते. ही स्कॉलरशिप शैक्षणिक, वसतिगृह, पुस्तके इंटरनेट, लॅपटॉप आणि स्टेशनरी खर्चासाठी वापरता येते. (Kotak Kanya Scholarship)

आवश्यक कागदपत्रे

 • 12वी मार्कशीट
 • महाविद्यालयाकडून बोनाफाईड प्रमाणपत्र
 • आधार कार्ड
 • बॅंक पासबुक
 • अपंगत्व प्रमाणपत्र (असल्यास)
 • अर्जदाराचा पासपोर्ट फोटो
 • फी संरचना (Fee Structure शैक्षणिक 2022-23 साठी)
 • कॉलेज सीट वाटप दस्तऐवज
 • पालकांचा उत्पन्नाचा दाखला
 • FY 2021-22 साठी पालकांचा ITR (असल्यास)
 • पालकांचे मृत्यू प्रमाणपत्र (एकल पालक/अनाथ उमेदवारांसाठी)

असा करा ऑनलाईन अर्ज..

 • सर्वप्रथम https://www.buddy4study.com/page/kotak-kanya-scholarship या वेबसाईटवर जा.
 • तुम्ही Buddy4Study या वेबसाईटवर अगोदर नोंदणी केलेली असेल, तर नोंदणीकृत आयडी टाकून लॉग इन करा.
 • जर तुम्ही नोंदणी केलेली नसेल, तर Buddy4Study नोंदणी करून घ्या.
 • यानंतर, ‘Start Application’ बटणावर क्लिक करा.
 • तुमच्यासमोर अर्ज ओपन होईल, अर्ज व्यवस्थितपणे भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
 • नियम आणि अटी (Terms and Conditions) स्वीकारून ‘Preview’ बटणावर क्लिक करा.
 • सर्वात शेवटी ‘Submit’ बटणावर क्लिक करा. (Kotak Kanya Application Form)

अधिक माहितीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क करा 👉 011-430-92248 (सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत)
तसेच अधिक माहितीसाठी ईमेल आयडी 👉 [email protected]

हे देखील वाचा-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!