अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले, असा करा क्लेम; तत्काळ मिळेल पिक विमा; पिक विमा पाहिजे तर हे काम करा | Pik Vima Claim

महाराष्ट्र राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे अशा शेतकरी बांधवांनी जर पिक विमा योजनेअंतर्गत त्यांच्या शेती पिकांचा पीक विमा उतरवलेला असेल तर अशा शेतकऱ्यांना पिक विमा संरक्षण मिळालेले असल्यामुळे पिक विमा मिळवण्यासाठी हे शेतकरी पात्र असून त्यांनी 72 तासाच्या आत पिक विमा कंपनीकडे Avkali Paus Garlith Nuksan Bharpaai दावा दाखल करायचा आहे.

नुकसान ग्रस्त शेतकरी बांधवांना झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी पिक विमा मिळवणे हा एक चांगला पर्याय आहे. पिक विमा योजनेअंतर्गत तुमच्या शेती पिकांना पिक विमा उतरल्यानंतर विमा संरक्षण मिळालेले असते त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे तुमच्या शेती पिकांचे नुकसान झाल्यास तुम्हाला नियमानुसार पिक विमा कंपनीला Nuksan Bharpai मिळवण्यासाठी नुकसान झाल्यापासून 72 तासाच्या पूर्वी कळवावे लागते.

जर तुमच्या सुद्धा शेती पिकांचे अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या असेल तर तुम्ही पिक विमा कंपनीकडे ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने नुकसान भरपाईचा दावा म्हणजेच पिक विमा क्लेम करू शकतात. तुम्ही नुकसान भरपाईच्या दावा पीक विमा कंपनीकडे दाखल केल्यानंतर तुम्हाला एक डोकेट आयडी देण्यात येतो म्हणजेच एक प्रकारे तुम्ही दावा दाखल केल्याची पावती तुमच्याकडे असते, ज्याच्या माध्यमातून तुम्ही भविष्यामध्ये जर तुम्हाला नुकसान होऊन सुद्धा पिक विमा मिळाला नाही तर कृषी विभागाकडे किंवा pik vima कंपनीकडे तुम्ही दाद मागू शकतात.

पिक विमा कंपनीकडे नुकसान भरपाई चा क्लेम केल्यानंतर पिक विमा कंपनीचे प्रतिनिधी प्रत्यक्षात तुमच्या शेतामध्ये येऊन तुमच्या नुकसान भरपाईची पाहणी करतात. त्यानंतर त्याचा अहवाल पिक विमा कंपनीकडे सादर करण्यात येतो. त्यानंतर पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या टक्यानुसार पिक विम्याचे वाटप करण्यात येत असते.

शेतकरी बांधवांना जर तुम्ही तुमच्या शेती पिकांचा प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत पिक विमा काढलेला असेल तर तुमच्या शेती पिकांचे नुकसान झाल्यानंतर तुम्हाला 72 तासाच्या आत पीक विमा कंपनीकडे दावा दाखल करणे अनिवार्य आहे. जर तुम्ही पिक विमा कंपनीकडे नुकसान भरपाईचा दावा दाखल केला नाही तर तुम्हाला पिक विमा मिळण्याची शक्यता अत्यंत कमी असते. जर तुम्ही पिक विमा कंपनीकडे दावा दाखल केला तर तुमच्याकडे Nuksan Bharpai चा दावा दाखल केल्याचा प्रूफ असते ज्याच्या माध्यमातून तुम्ही पिक विमा मिळण्यासाठी दाद मागू शकतात.

तसेच Pik Vima Claim केल्यानंतर तुम्ही तुमच्या पिक विम्याची स्टेटस ऑनलाईन पद्धतीने चेक करू शकतात. त्यामुळे नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पिक विमा कंपनीकडे ऑनलाइन पद्धतीने क्लेम करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!