Cast Certificate Apply Online Maharashtra | जात प्रमाणपत्र असे काढा मोबाईलवर

Cast Certificate Apply Online Maharashtra: जातीचा दाखला म्हणजेच जात प्रमाणपत्र.. एखादी व्यक्ती कोणत्या जातीची आहे हे प्रमाणित करणारा सरकारी दस्तऐवज म्हणजे जातीचा दाखला.. सरकारी योजना तसेच महाविद्यालयात राखीव जागांसाठी अर्ज करण्यासाठी अनेकदा जात प्रमाणपत्र द्यावे लागते. जात प्रमाणपत्र विविध कामांसाठी उपयोगी आहे.

Cast Certificate Apply Online

जातीचे प्रमाणपत्र या ठिकाणी कामी येते:- सरकारी नोकरीत आरक्षणासाठी, शाळा महाविद्यालयात प्रवेश शुल्कामध्ये संपूर्ण किंवा ठराविक सूट मिळवण्यासाठी, शैक्षणिक संस्थांमध्ये राखीव जागांमधून प्रवेश मिळवण्यासाठी, काही सरकारी नोकऱ्यांमध्ये वयोमर्यादेत अतिरिक्त वयाची सूट मिळवण्यासाठी व स्पर्धा परिक्षांमध्ये वयासंदर्भातील सूट मिळवण्यासाठी.

महाराष्ट्रात किंवा कुठेही देशात कोणत्याही राज्यांमध्ये सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल, तर जातीचे प्रमाणपत्र आवश्यक असते. जातीचे प्रमाणपत्र तहसीलदार कार्यालयातील सेतू केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र किंवा तुम्ही देखील ऑनलाईन अर्ज करू शकता. (Cast Certificate Document in Marathi)

जात प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे Cast Certificate Apply Online


ओळखीचा पुरावा: (आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, रोजगार हमी योजना ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणताही एक पुरावा)
पत्ता दर्शवणारा पुरावा: (आधार कार्ड, पासपोर्ट, मतदान कार्ड, रेशनकार्ड, पाणी बिल, वीजबिल, घरफळा पावती, सातबारा किंवा 8-अ उतारा यापैकी एक कागदपत्रं)
अर्जदाराचे वडील अथवा आजोबांच्या प्राथमिक शाळा प्रवेश नोंदवहीचा उतारा
अर्जदार अथवा अर्जदाराच्या वडीलांचा शाळा सोडल्याचा दाखला (हे नसल्यास इतर कागदपत्रांपैकी एक कागदपत्रं सादर करावे)
वडील अथवा जवळच्या नातेवाईकाचा जन्म नोंदवहीचा उतारा
सामाजिक न्याय विभागाने जारी केलेले जात प्रमाणित करणारे कागदपत्र-अर्जदाराचे वडील अथवा जवळच्या नातेवाईकासाठी छाननी समितीने जारी केलेले वैधता प्रमाणपत्र
ग्रामपंचायत नोंद अथवा महसूल नोंदीची प्रत
जात अधिसूचित होण्याच्या तारखेपूर्वीच्या निवासाचे साधारण ठिकाण आणि जातीसंदर्भातील कागदोपत्री पुरावे
सक्षम प्राधिकरणाने जारी केलेले अन्य संबंधित कागदोपत्री पुरावे
जात प्रमाणपत्र स्वंयघोषणापत्र भरून द्यावं लागते. हे सर्वांसाठी अनिवार्य आहे.

अतिरिक्त कागदपत्रे (लागू असल्यास)


वडिलांच्या जातीचा पुरावा उपलब्ध नसल्यास नातेवाईकाचे जात प्रमाणपत्र आणि नातेवाईकासोबतच्या नात्याचा तपशील देणारे वंशावळीचे शपथपत्र जोडावे लागेल. ‘Cast Certificate in Marathi’

आपले सरकार पोर्टलवर किंवा तहसीलदार कार्यालयात वरील सर्व कागदपत्रांसह अर्ज सादर केल्यानंतर 21 दिवसांच्या कालावधीमध्ये तुमचा अर्ज व सर्व आवश्यक कागदपत्रं अपलोड केलेली असतील तर मंजूर होईल आणि तुम्हाला जातीचे प्रमाणपत्र मिळून जाईल. (Cast Certificate in Maharashtra)

जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी येथे करा अर्ज.. Cast Certificate Apply Online


Cast Certificate Application Form Maharashtra जात प्रमाणपत्र काढण्यासाठी सेतू केंद्र किंवा महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या अआपले सरकार पोर्टलवर तहसीलदार कार्यालयातही उपलब्ध आहे. तुम्ही आपले सरकार पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज करू शकता. पुढील दिलेल्या https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ या लिंकवर क्लिक करून अर्ज करा.

हे देखील वाचा-

click here abdnews

घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
योजना सौर पॅनेल बसवा आणि २५ वर्ष मोफत वीज मिळवा.
1 KW सोलर लावायला काय खर्च येईल? त्यावर काय काय चालू शकते??

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!