काय तर म्हणे “या” बाबाने डोक्यावर हात ठेवला की लगेच कॅन्सर बरा होतो ; काय आहे नेमकं प्रकरण?

औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात असलेल्या पारुंडी गावामध्ये मागील काही दिवसांपासून चालू असलेली आरोग्य सभा ही सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली आहे. कारण काय तर म्हणे या सभेमध्ये चक्क एका बाबाने (भोंदुच म्हणाना) डोक्यावर हात ठेवता क्षणी दुर्धर आजार बरे होत असल्याचा दावा केला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

बाबासाहेब शिंदे नावाचा हा माणूस (भोंदू बाबा) मागील दीड ते दोन वर्षांपासून पारुंडी गावात आरोग्य सभेचे आयोजन करतो, आणि आपण रोग्याच्या डोक्यावर हात ठेवल्याने कर्करोग (cancer), मधुमेह (diabetes) बीपी (blood pressure) यासह प्रत्येक आजारातून त्यांना मुक्त करण्याचा दावा हा बाबासाहेब शिंदे करतो.

दर शुक्रवारी पारुंडी गावातल्या आरोग्य सभेत ज्या लोकांवर डॉक्टर देखील उपचार करू शकले नाहीत, त्यांना सुद्धा मी येशुंच्या आशीर्वादाने पूर्णपणे बरं केल्याचा दावाही या भोंदू बाबानं केला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक लोकं त्याच्या या फसव्या बोलण्याला खरे मानून त्याच्याकडे उपचार घेण्यासाठी याठिकाणी येत असत. शिवाय रोग्याला बरे करण्याचे आपण पैसे घेत नसून फक्त सामाजिक कार्य म्हणून हे काम करत असल्याचा दावा देखील बाबासाहेब शिंदे याने केला आहे..

दर शुक्रवारी या गावामध्ये उपचार घेण्यासाठी औरंगाबाद, जालना बीडसह अनेक जिल्ह्यातून लोकं श्रध्देपोटी येथे येतात. यात कुणाला कंबरेचा तर, कोणाला पोटाचा त्रास आहे, कुणाचे डोळे गेले तर कुणाला डोक्याचा त्रास, पण सर्वांचा इलाज फक्त डोक्यावर हात ठेवल्याने बरा होत असल्याच्या अपेक्षने लोकं येतात.

तसेच लोकांनी आणलेल्या वाहांनाची संख्येत सुमारे दोन-अडीचशे चारचाकी ( four wheeler), पन्नास- शंभर तीनचाकी (three wheeler), दोन तीनशे मोटरसायकल ( two wheeler) इतकी असते. आणि इथे आलेल्या चारचाकी आणि तीनचाकी वाहनासाठी पन्नास रुपये तर मोटरसायकलच्या पार्किंगसाठी 20 रुपये दर आकारले जातात. आणि इथेच त्यांचे फावते..

आणि विशेष बाब म्हणजे बाबासाहेब शिंदे याच्या आरोग्य सभेला protection करण्यासाठी किमान शंभर-सव्वाशे महिला- पुरुष गार्ड म्हणून उभे करण्यात येत होते. आणि ते उपचारासाठी येणाऱ्या लोकांवर बारीक लक्ष ठेवून असायचे की, कुणी मोबाईलमध्ये बाबाची उपचार पद्धतीचा व्हिडिओ शूट केला तर त्याला अरेरावी करून त्याचा मोबाईल जप्त करून सबंधित व्हिडिओ डिलीट केले जायचे.

मित्रानो जरा विचार करा की जर अशा भोंदू बाबांनी दुर्धर आजारावर उपचार करून लोकांना बरे केले असते तर तरुणांनी MBBS, MS, BHMS, MD करण्याचे सोडून बाबासाहेबाचं शिष्यत्व पत्करल असतं आणि वैद्यकीय महाविद्यालय ओस पडली असती.

पण मुख्य प्रश्न हा आहे अश्या भोंदू बाबाच्या नादी लागून लोकांनी कॅन्सर, बीपी, शुगरच्या गोळ्या घेणं सोडून दिलं आणि त्यांचा आजार वाढल्यामुळे कुणाचा मृत्यू झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? त्यामुळे मित्रानो अशा लोकांच्या दाव्यांवर विश्वास ठेवणं कितपत योग्य आहे हे तुम्हीच ठरवा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!