Soyabean Tokan Yantra Anudan | सोयाबीन टोकण यंत्रावर 50 टक्के अनुदान, असा घ्या योजनेचा लाभ..

Soyabean Tokan Yantra Anudan
Soyabean Tokan Yantra Anudan

Soyabean Tokan Yantra Anudan: भारत हा कृषीप्रधान देश असल्याने निम्म्याहून अधिक लोकसंख्या शेती हा व्यवसाय करतात. शेतीमध्ये खरीप व रब्बी हंगामात विविध प्रकारची पिके घेतली जातात. यासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून काढणीपर्यंत अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.

अनेक लोक आपल्या वडीलधाऱ्या माणसांनी जशी शेती शिकवली आणि पिकवली त्याप्रमाणे आपणही शेती करण्याचं शिकलो. पण बदलत्या काळानुसार देशातील कृषी संबंधित कंपन्यांनी नवनवीन यंत्रे-अवजारे तयार केले. या नवनवीन यंत्राच्या साहाय्याने शेतकरी शेती करत आहे.

आत्ताच्या काळात शेतीसाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे आणि चाऱ्याचे दर वाढल्यामुळे बैलजोडी घेणं परवडत नाही. यावर उपाय म्हणजे पेरणी सोयाबीन टोकण यंत्र.. (Soyabean Tokan Yantra) या टोकण यंत्रात दाणेदार खते व सोयाबीन बियाणे टाकून यांचे एकाच वेळी पेरणी करता येते.

या यंत्राच्या साहाय्याने तुम्ही सोयाबीन पिकाची टोकण करता येते. या यंत्रात दोन ओळीतील अंतर पिकाच्या आवश्‍यकतेनुसार 22.5, 30, 45, 60 सेंटिमीटर ठेवता येते. या यंत्राद्वारे एका दिवसात 1 ते 1.5 एकर क्षेत्रावर टोकण करून वेळेची आणि पैशांची दोन्ही बचत करता येते. या टोकण यंत्रासाठी सरकारकडून अनुदान दिले जाणार आहे. याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

सोयाबीन टोकण यंत्रासाठी 50 टक्के अनुदान.‌.
Soyabean Tokan Yantra Subsidy अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना ट्रॅक्टरच्या साहाय्याने जास्त पैशामुळे पेरणी करणं परवडत नाही. अशा शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर सोयाबीन टोकण यंत्र दिले जाणार आहे. (Tokan Yantra Subsidy)

Soyabean Tokan Yantra Anudan Yojana सोयाबीन टोकण यंत्राची किंमत 7 ते 9 हजार रुपयांपर्यंत असते. यासाठी सरकारकडून 50 टक्के म्हणजेच 3500 ते 4500 रुपये अनुदान देण्यात येईल. जर तुम्हाला 50 टक्के अनुदान हवे असेल, तर 10,000 रुपयांपर्यंतचे टोकण यंत्र घ्यावे लागेल.

योजनेची पात्रता
अर्जदार संबंधित जिल्ह्याचा रहिवाशी असावा.
अर्जदार अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील असणं आवश्यक आहे.
अर्जदाराने या योजनेच्या सर्व अटी व शर्ती पूर्ण करणं आवश्यक आहे. (Tokan Yantra Subsidy)

सोयाबीन टोकण यंत्रासाठी आवश्यक कागदपत्रे Soyabean Tokan Yantra Anudan


आधार कार्ड
सातबारा व 8-अ उतारा
बॅंक पासबुक झेरॉक्स
जात प्रमाणपत्र
अपंग असल्यास अपंगत्व प्रमाणपत्र

सोयाबीन टोकण यंत्रासाठी असा करा अर्ज.. Soyabean Tokan Yantra Anudan


सोयाबीन टोकण यंत्राकरिता अर्ज करण्यासाठी वरील दिलेल्या सर्व कागदपत्रांची झेरॉक्स काढून घ्या. यानंतर तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद / पंचायत समिती कार्यालय जाऊन सोयाबीन टोकण यंत्राचा अर्ज घ्यायचा आहे. अर्जात विचारलेली माहिती व्यवस्थितपणे भरून दिलेली कागदपत्रे जोडून अर्ज सबमिट करा.

Soyabean Tokan Yantra सोयाबीन टोकण यंत्रासाठी तुम्ही ऑनलाईन देखील अर्ज करू शकता. (soyabean token yantra) यासाठी तुम्हाला महाडीबीटी (Mahadbt) पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

सोयाबीन टोकण यंत्राकरिता अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा


👉👉 येथे क्लिक करा 👈👈


हे देखील वाचा-


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!