WhatsApp Digilocker | व्हाट्सअपवर डाऊनलोड करा आधार कार्ड, पॅन कार्ड व इतर कागदपत्रे..

WhatsApp Digilocker

WhatsApp Digilocker: ‘व्हाट्स ॲप’वरुन आता सरकारी कामेही करता येणार आहेत. व्हाट्सअप एक सोशल मीडिया (Social Media) ॲप आहे. तसेच व्हाट्सअपने आपल्या युजर्ससाठी विविध सेवा सुरु केल्या. या सुविधाचा युजर्सना चांगला फायदा होत आहे.

व्हाट्सअपवर मार्च 2020 मध्ये ‘माय जीओव्ही हेल्प डेस्क’ (My Gov Help Desk) सुरू करण्यात आले होते. या व्हाट्सअपवर सुरू केलेल्या सुविधेमुळे नागरिकांना कोरोनाबाबत विश्वासार्ह माहिती देणे, लसीकरणासाठी नोंदणी करणे, तसेच कोरोना लसीकरण प्रमाणपत्र डाऊनलोड करता येत होते.

व्हाट्सअपवर सुरू करण्यात आलेल्या ‘माय जीओव्ही हेल्प डेस्क’ या सुविधेमुळे नागरिकांना मोठा फायदा झाला.. ही बाब लक्षात आल्यानंतर आता नागरिकांना सरकारी सेवा सहज उपलब्ध व्हाव्यात यासाठी पुन्हा व्हाट्सअपच्या या सुविधेची पुन्हा एकदा मदत घेतली जाणार आहे. यामुळे व्हाट्सअपवर सरकारी कागदपत्रे डाऊनलोड करता येणार आहे.

व्हाट्सअपवर सरकारी कागदपत्रे मिळणार.. WhatsApp Digilocker


व्हॉट्सॲपवरील ‘माय जीओव्ही हेल्प डेस्क’च्या माध्यमातून नागरिकांना आता ‘डिजी लॉकर’ (Digilocker) ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही सुविधा व्हाट्सअपवर सुरू केली आहे. (How to get Documents in Digilocker)

या सुविधेमुळे ‘डिजी लॉकर’ खात्याचे प्रमाणीकरण, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी प्रमाणपत्र व अन्य डिजी लॉकर कागदपत्रे व्हाट्सअपवर डाउनलोड करता येते. (How to download Digilocker documents on Whatsapp)

प्रशासन व सरकारी सेवा एका क्लिकवर आणण्याच्या दिशेने उचललेले हे महत्वाचे पाऊल आहे. या सेवेमुळे देशातील नागरिकांना आपली महत्वाची कागदपत्रे घरबसल्या सुरक्षित, सहजपणे हाताळता येतील. (WhatsApp Aadhar Card Download)

या व्हाट्सअप सुविधेमुळे पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, शैक्षणिक प्रमाणपत्र, वाहन नोंदणी प्रमाणपत्र, जीवन विमा – दुचाकी, विमा व अन्य डिजी लॉकर कागदपत्रे सुरक्षित ठेवता येणार आहेत. ‘डीजी लॉकर’वर आतापर्यंत 10 कोटींपेक्षा जास्त नागरिकांनी नोंदणी केली असून, 5 अब्जापेक्षा जास्त सरकारी कागदपत्रे वितरित केली आहेत.

असा घ्या सुविधेचा लाभ…


ही सुविधा वापरण्यासाठी व्हाट्सअपवर ‘नमस्ते’, हाय किंवा ‘डीजी लॉकर’ असा मेसेज +91 9013151515 या व्हाट्सअप नंबरवर पाठवा. (WhatsApp Digilocker Number)
आता तुमच्यासमोर दोन पर्याय येतील, पहिला पर्याय ‘Digilocker’ व दुसरा पर्याय ‘Cowin’ असेल. येथे तुम्ही ‘Digilocker’ पर्यायावर क्लिक करा.


यानंतर, तुम्हाला विचारले जाईल Digilocker मध्ये तुमचे खाते आहे का? खाते असेल तर ‘Yes’ पर्याय निवडा.
आता तुमचा आधार क्रमांक टाकून ओटीपी व्हेरिफिकेशन करा. (Digilocker WhatsApp Number)
यानंतर, तुम्हाला कोणती कागदपत्रे डाऊनलोड करायची विचारली जाईल. तर तुम्ही आधार कार्ड, पॅन कार्ड व अन्य कोणतीही कागदपत्रे डाऊनलोड करायची तो पर्याय निवडा.
जी कागदपत्रं निवडली असेल ती तुमच्यासमोर लगेच पीडीएफ फाईलमध्ये येईल.


हे देखील वाचा-


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!