PM Jan Aushadhi Kendra Yojana

PM Jan Aushadhi Kendra Yojana | जन औषधी केंद्र सुरू करा आणि करा चांगली कमाई, सरकारकडून मिळतंय 2 लाख अनुदान..

PM Jan Aushadhi Kendra Yojana
PM Jan Aushadhi Kendra Yojana

PM Jan Aushadhi Kendra Yojana: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जन औषधी केंद्रांची जी संख्या आहे, ती 2024 पर्यंत 10,000 पर्यंत वाढवण्याचे ठरवले आहे. प्रधानमंत्री जन औषधी योजनेमार्फत केंद्र सरकार नागरिकांना स्वस्त दरात औषधांचा पुरवठा करते. मोदी सरकार लोकांना या माध्यमातून देशाच्या अनेक भागात पंतप्रधान जन औषधी केंद्र सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत.

PM Jan Aushadhi Kendra केंद्र सरकार नवीन जन औषधी केंद्र उघडण्यासाठी 5 लाख रुपये इतकी प्रोत्साहनपर रक्कम देते. याशिवाय हे केंद्र आकांक्षी जिल्ह्यात उघडल्यास आणखी 2 लाख रुपये उपलब्ध होतील. म्हणजेच सदर प्रकरणात प्रोत्साहन रक्कम 7 लाख रुपये मिळेल.

जर एखादी महिला अपंग, अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीसाठी जन औषधी केंद्र सुरू करण्याचा विचार करत असेल, तर त्या महिलेस मोदी सरकार 7 लाख रुपये प्रोत्साहन रक्कम देईल. (प्रधानमंत्री जन औषधी केंद्र योजना) याअगोदर ही प्रोत्साहन रक्कम फक्त अडीच लाख रुपये होती. ‘Pradhan Mantri Jan Aushadhi Kendra Yojana’

औषधी विक्रीवर मिळते एवढे कमिशन.. PM Jan Aushadhi Kendra Yojana


PM Jan Aushadhi Kendra आता केंद्र सरकार जन औषधी योजनेअंतर्गत जन औषधी केंद्राचे फर्निचर व इतर आवश्यक सुविधा तयार करण्यासाठी प्रत्येक केंद्राला 1.5 लाख रुपये मदत करत आहे. तसेच संगणक आणि प्रिंटरसह बिलिंग सिस्टम विकसित करण्यासाठी मोदी सरकार प्रत्येक जन औषधी केंद्राला 5 हजार रुपये देते.

जन औषधी केंद्रावर औषधांच्या विक्रीवर जास्तीत जास्त 20 टक्क्यांपर्यंत कमिशन मिळते. याशिवाय, प्रत्येक महिन्याच्या विक्रीवर 15 टक्के प्रोत्साहन स्वतंत्रपणे दिलं जाते. जन औषधी केंद्राद्वारे तुम्हाला चांगली कमाई करण्याची संधी आहे. (Pradhan Mantri Jan Aushadhi Kendra Information in Marathi)

जन औषधी केंद्रासाठी हे लोक अर्ज करू शकतात..PM Jan Aushadhi Kendra Yojana


पहिल्या प्रकारात कोणतीही व्यक्ती, बेरोजगार फार्मासिस्ट, डॉक्टर किंवा रजिस्टर मेडिकल प्रॅक्टीशन स्टोअर सुरू करू शकतात.
दुसर्‍या प्रकारात विश्वस्त, स्वयंसेवी संस्था, खाजगी रुग्णालये, सोसायटी बचत गट अर्ज करू शकतात.
तिसर्‍या प्रकारात राज्य सरकारकडून नामनिर्देशित संस्था आहेत. (PM Jan Aushadhi Kendra Maharashtra)

जन औषधी केंद्र उघडण्यासाठी पात्रता
अर्जदाराचे d.pharm (डी.फर्मा) किंवा b.pharm (बी.फार्मा) झालेलं असणं आवश्यक आहे.
डी.फार्मा किंवा बी.फार्मा अंतिम मंजुरीच्या वेळी पुरावा
जन औषधी केंद्रासाठी अर्ज करणारी कोणतीही संस्था किंवा NGO यांना B.Pharmacy / D.Phatmacy पदवीधारकांना नियुक्त करावे लागेल.
सरकार मध्ये वैद्यकीय महाविद्यालयांसह रुग्णालय परिसर. पसंतीची एजन्सी नामांकित एनजीओ / चॅरिटेबल संस्था असेल, परंतु व्यक्ती देखील पात्र असतील. (Jan Aushadhi Kendra Online)

जन औषधी केंद्र सुरू उघडण्यासाठी असा करा अर्ज..


pm jan aushadhi Kendra apply online तुम्हाला जन औषधी केंद्र सुरू करायचे असेल, तर तुम्हाला जन औषधी केंद्राच्या नावावर रिटेल ड्रग सेल्सचा परवाना घ्यावा लागेल. यासाठी तुम्हाला 5000 रुपये अर्ज शुल्क भरावा लागेल. यासाठी http://janaushadhi.gov.in/online_registration.aspx या लिंकवर क्लिक करून अर्ज डाऊनलोड करा.


हे देखील वाचा-


Similar Posts