Fundkar Falbag Anudan Yojana | फळबाग लागवडीसाठी 100 टक्के अनुदान मिळवा, असा घ्या लाभ..

Fundkar Falbag Anudan Yojana

Fundkar Falbag Anudan Yojana: राज्यातील भरपूर शेतकरी फळबाग लागवड करत आहेत. सर्वात जास्त पश्चिम महाराष्ट्रात फळबाग लागवड केली जाते. फळबाग लागवड ही संकल्पना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेली आहे. यासाठी राज्य सरकारकडून विविध योजना राबविल्या जातात.

राज्यात आता पर्यंत 18 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर फळबागा Fundkar Falbag Anudan Yojana उभ्या आहेत‌. मात्र, अद्याप फळबाग लागवडीमध्ये अपेक्षित असे यश मिळालेले नाही. म्हणूनच आज आम्ही आपल्याला एक 100 टक्के अनुदान देणाऱ्या एका खास योजनेविषयी सांगणार आहोत. (Falbag Yojana 2022)

राज्य सरकार कडून फळबागायतदार शेतकऱ्यांसाठी नवीन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचं नाव ‘भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना’ (Balasaheb Fundkar Falbag Yojana)असं आहे. ही योजना 2018-19 पासून सुरू करण्यात आली. ही योजना कृषी विभागामार्फत राबविली जाते.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडीसाठी पात्र ठरू शकत नाहीत अशा शेतकऱ्यांकरिता राज्य सरकारने नवीन राज्य पुरस्कृत फळबाग लागवड योजना मंजूर करण्याचा निर्णय दि. 20 जून 2018 रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला होता. (Bhausaheb Falbag Fundkar Yojana 2022)

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना पहिल्या वर्षी 50 टक्के दुसऱ्या वर्षी 30 टक्के आणि तिसऱ्या वर्षी 20 टक्के अशा तीन वर्षात अनुदानाचा लाभ देण्यात येतो. Fundkar Falbag Anudan Yojana लाभार्थी शेतकऱ्यांनी दुसऱ्या व तिसऱ्या वर्षीच्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी लागवड केलेल्या झाडांचे जीविताचे प्रमाण बागायती झाडांसाठी 90 टक्के तर कोरडवाहू झाडांसाठी 80 टक्के ठेवणे आवश्यक आहे. Fundkar Falbag Anudan Yojana

bhausaheb fundkar falbag fundkar yojana information in marathi या योजनेमार्फत पीक व पशुधन तसेच फळबागेच्या रूपाने शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध करून देणे आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यास व उत्पन्न दुप्पट करण्यास मदत करणे, असे भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेचे उद्दिष्ट आहे.

bhausaheb fundkar falbag yojana शेतकऱ्यांना स्वतःच्या खर्चाने करावयाची कामे:- जमीन तयार करणे, खत मिश्रणाने खड्डे भरणे, कुंपण करणे, खते देणे, आंतर मशागत करणे इत्यादी कामे स्वतःच्या खर्चाने करावी लागेल.

सरकारमार्फत मिळालेल्या अनुदानावर करावयाची कामे:- खड्डे खोदणे, कलमे/ रोपे लागवड, नांग्या भरणे, ठिबक सिंचन करणे, पीक संरक्षण करणे इत्यादी कामे सरकारमार्फत मिळालेल्या अनुदानावर होईल.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  • सातबारा व 8-अ उतारा
  • हमीपत्र
  • संयुक्त खाते असल्यास सर्व खातेदारांचे समंतीपत्र
  • जात प्रमाणपत्र (अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती शेतकऱ्यांसाठी)

या योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज.. Fundkar Falbag Anudan Yojana

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. यासाठी राज्य सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे. (bhausaheb fundkar falbag yojana online application)
  • या वेबसाईटवर आल्यानंतर, ॲप्लिकेशन या लिंकवर क्लिक करा.
  • यानंतर, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड अनुदान योजना या लिंकवर क्लिक करा.
  • आता तुमच्यासमोर अर्ज ओपन होईल. अर्जामध्ये विचारलेली माहिती व्यवस्थितपणे भरा.
  • सर्वात शेवटी सबमिट बटणावर क्लिक करा.

हे देखील वाचा-


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!