Jamin Kharedi Anudan Yojana | जमीन घेण्यासाठी मिळेल एवढे टक्के अनुदान

Jamin Kharedi Anudan Yojana

Jamin Kharedi Anudan Yojana: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती आहे. अनेकांकडे जमीन नसल्याने फार बिकट परिस्थिती निर्माण होते. जमीन घेणं देखील काय एवढे सोपे नाही. परंतु, आता भूमिहीन लोकांना काळजी करण्याची गरज नाही. जमीन घेण्यासाठी सरकारकडून अनुदान मिळणार आहे.

तुम्ही देखील जमीन घेण्यासाठी इच्छुक असाल तर ही योजना तुमच्यासाठी आहे. या योजनेचं नाव ‘दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना’ (Dadasaheb Gaikwad Sabalikaran Yojana) असं आहे. या योजनेअंतर्गत भूमिहीन धारकांसाठी शेतजमीन खरेदीसाठी 100 टक्के अनुदान दिले जाते.

लोकांचे जीवनमान उंच व्हावे व आर्थिक परिस्थिती सुधारावी हा या योजनेचा उद्देश आहे. (dadasaheb gaikwad yojana) यामुळे तुम्ही स्वतःची जमीन घेऊन चांगले उत्पादन काढून पैसा मिळवू शकता. जे भूमिहीन आहेत त्यांच्यासाठी ही योजना आहे. या योजनेविषयी जाणून घेऊ या..

योजनेची माहिती
भारत हा कृषिप्रधान देश असल्याने निम्म्याहून अधिक लोकसंख्या ही शेती व्यवसाय करते. लोकांनी स्वतःच्या पायावर उभे राहावे यासाठी सरकारने ‘दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना’ सुरू केली. जे नागरिक भूमिहीन त्यांच्यासाठी ही योजना आहे. (dadasaheb gaikwad bhumihin yojana)

या योजनेअंतर्गत पात्र उमेदवारांना जमीन खरेदी करण्यासाठी 100 टक्के अनुदान दिले जाते. तर यामध्ये 2 एकर बागायती किंवा चार एकर कोरडवाहू जमीन घेण्यासाठी 100 टक्के अनुदान दिले जाते. ‘दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना’ 14 ऑगस्ट 2018 रोजी सुरू करण्यात आली. (शेत जमीन खरेदी योजना 2022)

या लोकांना घेता येईल या योजनेचा लाभ – या योजनेचा लाभ दारिद्र्यरेषेखालील, भूमिहीन शेतमजूर, विधवा महिला, अनुसूचित जाती व जमातीच्या व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येईल. ‘dadasaheb gaikwad sabalikaran yojana 2022’

योजनेची पात्रता


या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्राचा रहिवासी असणं आवश्यक आहे.
अर्जदाराचे वय 18 ते 60 वर्षे असणं आवश्यक आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी दारिद्र्यरेषेखालील, भूमिहीन शेतमजूर, विधवा महिला, अनुसूचित जाती व जमातीतील व्यक्ती असावा. (दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना 2022)

आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
रेशनकार्ड
रहिवाशी दाखला


शाळा सोडल्याचा दाखला
दारिद्र्यरेषेखालील असल्यास प्रमाणपत्र
उत्पन्नाचा दाखला
विधवा परित्यक्ता घटस्फोटित असल्याचा दाखला पुरावा

असा करा अर्ज..


या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. यासाठी तुम्हाला अर्ज नमुना डाऊनलोड करावा लागणार आहे. (Dadasaheb Gaikwad Sabalikaran Yojana Form) योजनेच्या अधिक माहितीसाठी व अर्ज नमुना डाऊनलोड करण्यासाठी ‘येथे क्लिक करा’ या बटणावर क्लिक करा.

योजनेच्या अधिक माहितीसाठी वअर्ज नमुना डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा


👉👉 येथे क्लिक करा 👈👈

शेतकऱ्यांनो या ॲपचे नाव ‘वॉटर डिटेक्टर’ (Water Detector) असं आहे. या ॲपमुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. ही ॲप डाऊनलोड करून तुम्ही लगेच पाणी कुठे आहे हे पाहू शकता. हे ॲप डाऊनलोड करण्यासाठी जिथे तुम्हाला ‘येथे क्लिक करा’ बटण दिसेल त्यावर क्लिक करा.


हे देखील वाचा-


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!