“प्रवास करा मनसोक्त” सह इतर वेगवेगळ्या योजनासहित आजपासून शहरात धावणार 30 स्मार्ट सिटी बस..

  • आजपासून संभाजीनगर (औरंगाबाद) मधील 5 नवीन मार्गावर ‘माझी स्मार्ट बस’ सेवा सुरू..
  • संभाजीनगर (औरंगाबाद) स्मार्ट सिटीची ‘माझी स्मार्ट बस’ आज शुक्रवार दि. 1 जुलै 2022 पासून 5 नवीन मार्गावर सुरू होत आहे.

Travel with pleasure: स्मार्ट सिटीचे CEO आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली ‘माझी स्मार्ट बस’ पुन्हा नवीन ऊर्जेने सुरू करण्यात आली असून मागे रा. प. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संपामुळे बंद असलेल्या स्मार्ट शहर बस सेवा काही प्रमाणात प्रभावित झाली होती. मात्र आस्तिक कुमार पाण्डेय यांनी योग्य ते निर्णय घेतल्यामुळे नव्याने बस ड्रायव्हर आणि कंडक्टरची भरती करण्यात आली.

संभाजीनगरात शहर बससेवा अँड्रॉइड सिस्टीम संचलित ई-तिकिट सिस्टिम सोबत सुरू होत असून या सिस्टीमद्वारे प्रवाशांना बस भाडे रोख रक्कमेच्या व्यतिरिक्त स्मार्ट कार्ड, डेबिट कार्ड आणि मोबाईल वॉलेट आणि UPI द्वारे सुद्धा देता येणार आहे.

‘माझी स्मार्ट बस’च्या नवीन योजना खालील प्रमाणे..

  • “प्रवास करा मनसोक्त” या योजनेअंतर्गत प्रवाशांना दोन हजार रुपयांमध्ये 30 दिवस शहरातील कोणत्याही मार्गावर आणि कितीही वेळेस मनसोक्त प्रवासाचा आनंद लुटता येणार आहे.दिवसाला फक्त 80 रूपये खर्च करून प्रवाशांना शहरात कोठेही प्रवास करता येणार आहे.
  • साप्ताहिक रिचार्ज’ योजने अंतर्गत केवळ पाच दिवसांचे पैसे देऊन नागरिक सात दिवस प्रवास करू शकतील. म्हणजेच 400 रुपयांत एक आठवडा प्रवास करता येईल.
  • मासिक योजने अंतर्गत नागरिक केवळ वीस दिवसांचे पैसे देऊन 30 दिवस प्रवास करू शकतील. म्हणजेच 1600 रुपयांत एक महिना प्रवास करता येईल.
  • त्रैमासिक योजने अंतर्गत 60 दिवसांचे भाडे देऊन 90 दिवस प्रवास करता येणार आहे. म्हणजेच 4800 रुपयांत तीन महिने प्रवास करता येणार आहे.

आज पासून सुरू होणारे मार्ग

  • मार्ग क्र 7 – औरंगपुरा ते हिंदुस्तान आवास
  • मार्ग क्र. 8 – औरंगपुरा ते वाळूज
  • मार्ग क्र. 10 – औरंगपुरा ते शिवाजीनगर
  • मार्ग क्र. 16 – सिडको ते माळीवाडा
  • मार्ग क्र. 43 – मध्यवर्ती बस स्थानक ते करमाड

लवकरच स्मार्ट शहर बससेवा संपूर्ण क्षमतेने धावणार असून त्याचा लाभ संपूर्ण नागरिकांनी घेण्याची आहवान मनपा प्रशासक आणि स्मार्ट सिटी मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांनी केली. प्रवाशांना कोविड-19 प्रतिबंधात्मक सूचना देण्यासाठी बसमध्ये डिजिटल डिस्प्ले आणि ऑडिओ सिस्टमचा वापर केला जाईल. 

तसेच शालेय विद्यार्थ्यांकरीता बस स्टॉप ते शाळेपर्यंत विशेष सवलतीमध्ये पास मिळेल.  चालक-वाहकांच्या उपलब्धते नुसार टप्प्या-टप्प्याने सिटी बससेवा पूर्ण क्षमतेने सुरू केली जाणार आहे. स्मार्ट सिटीच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त स्मार्ट सिटीकडून ‘नाे युवर सिटी’ (Know Your City) हा नवीन उपक्रम सुरू करण्यात आला असून विद्यार्थी, शहरात येणाऱ्या पाहुण्यांना स्मार्ट सिटीतर्फे शहरात सुरू असलेली विविध विकासकामे दाखवण्यात येणार असून यासाठी विशेष बसची व्यवस्था करण्यात येणार आहे. ही सेवा मोफत असेल.

मागील अनेक दिवसांपासून शहर स्मार्ट बस पूर्ण क्षमतेने धावत नसल्याचा फटका सामान्यांना बसत होता. कोरोना तसेच एस.टी.चा संप यामुळे कायम सिटीबसने प्रवास करणार्‍या अनेक प्रवाशांनी प्रवासाचे इतर मार्ग निवडले होते, आता स्मार्ट सिटी बसने प्रवाशांसाठी अनेक आकर्षक योजना सुरू केल्यामुळे प्रवासी सिटीबसकडे मोठ्या प्रमाणावर आकर्षित होतील असा विश्वास प्रशासनाला आहे.

नियोजन पूर्ण Travel with pleasure

पाच टप्प्यांत पूर्ण क्षमतेने सिटी बस सुरू करण्यात येणार असून यासंदर्भातील सर्व तयारी पूर्ण झालेली आहे. संभाजीनगर (औरंगाबाद) स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड प्रशासनाने संपूर्ण तयारी केली असून गाड्या तसेच गाड्यांचे वेळापत्रक, कंट्रोल पॉइंट आदी सर्व बाबींची पूर्ण तयारी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!