महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी..! जाणून घ्या सरकारच्या योजनेबद्दल..

राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तसेच सरकार मार्फत गोरगरीब जनतेसाठी बऱ्याच योजना राबविल्या जातात. यामध्ये ग्रामीण भागातील महिलांना मोफत पिठाची गिरणी देणे ही देखील एक योजना असून महिलांना 100 टक्के अनुदानावर पिठाची गिरणी मिळणार आहे.

महिलांच्या हितासाठी आणि सक्षमीकरणाकरीता सरकार अनेक योजना राबवत आहे. या योजनेमध्ये महिलांना रोजगार देण्यासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याकरीता सरकार पिठाची गिरणी मोफत देत आहे. जिल्हा परिषदतर्फे मोफत पिठाची गिरणी मिळवून महिला घरबसल्या आपला व्यवसाय सुरू करू शकतात. मोफत पिठाची गिरणी 2022 योजने अंतर्गत अनुसूचित महिलांना मोफत पिठाची गिरणी दिली जातात. या योजने अंतर्गत गावातील 18 ते 60 वर्षे वयोगटातील महिला अर्ज करून पिठाची गिरणी मोफत मिळवू शकता.

काय आहे या योजनेचे उद्दिष्ट

मोफत पिठाची गिरणी योजना 2022 चा मुख्य उद्देश हा आहे की देशातील ज्या महिला आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे त्यांना जिल्हा परिषदेकडून मोफत पिठाची देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे असा आहे. जेणेकरून या योजनेच्या माध्यमातून महिलांना रोजगाराची संधी निर्माण करून देता येईल आणि त्यांना घरबसल्या काम करून चांगले उत्पन्न मिळू शकेल.

अर्ज कसा करायचा

मोफत पिठाची गिरणी मिळवण्यासाठी इच्छुक कामगार महिला ( Working women ) ज्यांना अर्ज करायचा आहे, त्यांनी खाली दिलेल्या लिंकवरून अर्ज डाऊनलोड करायचा आहे. अर्ज डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल जसे की नाव, पत्ता, मोबाइल नंबर आधार क्रमांक इ. सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला तुमची सर्व कागदपत्रे तुमच्या अर्जासोबत फोटो कॉपी संलग्न करून तुमच्या संबंधित कार्यालयाला भेट द्यावी लागतील. त्यानंतर तुमच्या अर्जाची पडताळणी कार्यालयाच्या अधिकाऱ्याकडून केली जाईल. पडताळणी केल्यानंतर, तुम्हाला मोफत पिठाची गिरणी दिली जाईल.

मोफत शिलाई मशिन मिळवण्यासाठी भारत सरकारच्या https://abdnews.in/pm-sholai-machine-scheme/ या वेबसाइटवर भेट द्या..

जिल्हा परिषद महिला व बाल विकास समिती यांच्यामार्फत तुमच्या जवळच्या पंचायत समितीमध्ये ज्या महिला अनुसूचित जमातीत मध्ये आहेत त्यांना 100 टक्के अनुदानावर पिठाची गिरणी पुरवणे ही योजना चालू असून यासाठी तुम्हाला विहित नमुन्यातील अर्ज पंचायत समितीमध्ये दाखल करावयाचा आहे.

आवश्यक कागदपत्रे.

• अर्जदाराचा विहित नमुन्यातील अर्ज,
• अर्जदार 12 वी शिकलेली असावी,
• लाभार्थी महिलेच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न 1 लाख 20 हजार रुपयांपर्यंत असल्याबाबतचा तलाठी किंवा तहसीलदार यांचा दाखला.

• सदर योजनेचा लाभ जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 18 ते 60 वयोगटातील मुली किंवा महिलांना घेता येईल.
• अर्जदार महिलेच्या आधार कार्डची झेरॉक्स प्रत सोबत जोडावी,
• अर्जदार महिलेच्या बँक खात्यात अनुदान वर्ग करण्यासाठी अर्जदार महिलेच्या बँक पासबुकची पहिल्या पानाची झेरॉक्स.
• घराचा आठ अ उतारा,
• लाईट बिलाची झेरॉक्स,

महिला व बाल विकास समितीने निवड केलेल्या भरतींना लाभ मंजूर झाल्याचे कळवण्यात येईल.

अर्ज कोठे कराल ?

विहित नमुन्यात अर्ज भरून सोबत आवश्यक कागदपत्रे भरून तुमच्या जवळच्या पंचायत समिती मध्ये अर्ज करावा लागतो.

मोफत पिठाची गिरणी मिळवण्यासाठी कोण कोण अर्ज करू शकते?

मोफत पिठाची गिरणी मिळवण्यासाठी अनुसूचित जमाती मधील महिला अर्ज करू शकतात.


(ही योजना फक्त सातारा जिल्ह्याकरिता लागू आहे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!