💥 क्रुझर-दुचाकीच्या अपघातात पती-पत्नीचा मृत्यू, दीड महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह; सिल्लोड तालुक्यातील घटना..

सिल्लोड तालुक्यामधील डोईफोडा-पारोळा फाट्यावर भरधाव क्रुझरने मोटारसायकस्वार पती-पत्नीला चिरडल्याची घटना काल मंगळवारी संध्याकाळी घडली असून या भीषण अपघातामध्ये मोटरसायलवरील पती सागर ईश्वर सपकाळ ( २७ , रा. बोदवड ता.सिल्लोड) याचा जागेवराच मृत्यू झाला, तर आज सकाळी पत्नी दुर्गाबाई सागर सपकाळ हीचा औरंगाबाद येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.

सविस्तर माहिती अशी की, सागर व दुर्गाबाई हे नवरा बायको मोटासायकल क्र. MH-20, CG- 4587 वरून सिल्लोडहून कन्नड मार्गावर होते तर देऊळगाव बाजारहून क्रुझर गाडी क्र. MH-14 4687 सिल्लोडकडे जात असताना डोईफोड़ा-पिरोळा या फाट्याजवळ मोटरसायकलला धडक दिली.

ही धडक इतकी जोरदार होती की, यात सागर जागीच ठार तर पत्नी दुर्गाबाई सपकाळ गंभीर जखमी झाल्या होत्या. आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी त्यांना तात्काळ सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. या अपघातात मोटरसायकलचा अक्षरशः चुराडा झाला. या अपघाताची सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!