जाणून घ्या महाराष्ट्राची ठळक वशिष्ट्ये…

आज 1 मे 2022 महाराष्ट्र दिन..!
1960 साली याच दिवशी महाराष्ट्र राज्य अस्तित्व निर्माण आलं. अर्थातच त्यासाठी अनेकांना मोठा संघर्ष करावा लागला,

महाराष्ट्राने अनेक चढ-उतार तसेच संकटांचा सामना करत विकासाची कास धरली आणि आज देशातील सर्वात विकसित राज्य म्हणून आपलं महाराष्ट्र अग्रस्थानी पोहोचलं आहे. आपल्या महाराष्ट्राबद्दल आपल्याला नक्कीच अभिमान आहे, परंतु आपला महाराष्ट्र नेमका कसा आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? चला तर मग आज जाणून घेऊया महाराष्ट्रा बद्दलच्या काही महत्त्वाच्या गोष्टी.

विस्तार-

महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1660 रोजी झाली. महाराष्ट्राचे एखून क्षेत्रफळ 3 लाख 7 हजार 713 चौरस किमी असून क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राचा देशामध्ये तिसरा क्रमांक लागतो.

महाराष्ट्राची सीमा तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, गुजरात या राज्यांशी तसेच दमण-दीव या केंद्रशासित प्रदेशाशी लागून आहे.

महाराष्ट्र हे खूप विशाल राज्य असून महाराष्ट्राची दक्षिणोत्तर लांबी 720 किमी तर पूर्व पश्चिम लांबी 800 किमी एवढी आहेत. तर महाराष्ट्राच्या पश्चिम सीमेवर अरबी समुद्र आहे. महाराष्ट्राला तब्बल 720 किमी लांबीचा पोपसमुद्रकिनारा लाभला आहे. त्यामुळे मासेमारी तसेच जलवाहतूक याबाबतीत महाराष्ट्र अग्रेसर आहे.

लोकसंख्या आणि मतदारसंघ

लोकसंख्येच्या बाबतीत सांगायचे राहिल्यास महाराष्ट्राची लोकसंख्या 11,23,74,330 एवढी आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई असून मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. तर नागपूर ही महाराष्ट्राची उप-राजधानी आहे.

👉🏻 विधानसभा मतदारसंघ- 288

👉🏻 विधानपरिषद मतदारसंघ- 78

👉🏻 लोकसभा मतदारसंघ- 48

👉🏻 राज्यसभा मतदारसंघ -19

👉🏻 महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. क्षेत्रफळाच्या दृष्टीने अहमदनगर हा राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे.

👉🏻 34 जिल्हा परिषद (मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यांना जिल्हा परिषद नाही.)

👉🏻 महाराष्ट्रातील तालुक्यांची संख्या- 358

👉🏻 महाराष्ट्रातील ग्रामपंचायातींची संख्या- 27855

👉🏻 महाराष्ट्रातील पंचायत समित्यांची संख्या- 351

👉🏻 महाराष्ट्रातील महानगरपालिका संख्या -27

👉🏻 महाराष्ट्रातील नगरपरिषद संख्या – 236

👉🏻 महाराष्ट्रातील नगरपंचायती संख्या -124

👉🏻 कटक मंडळांची संख्या- 7

महाराष्ट्र प्रशासकीयदृष्ट्या खालील 6 विभागामध्ये विभागला आहे.

▪️औरंगाबाद- औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड

▪️कोकण- पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग

▪️पुणे- पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर

▪️नाशिक- नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव

▪️नागपूर- नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर

▪️अमरावती- अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ,

महाराष्ट्राची वैशिष्ट्ये

▪️महाराष्ट्राची भूमी बेसाल्ट या अग्निजन्य खडकापासून बनलेली आहे.

▪️कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर असून त्याची उंची 1664 मी. आहे.

▪️गोदावरी, कृष्णा, सावित्री, नर्मदा, पंचगंगा, कोयना ही महाराष्ट्रातील प्रमुख नद्या आहेत.

▪️दख्खन पठारावर कापसाची काळी कसदार मृदा आढळते.

▪️आंबोली जि. सिंधुदुर्ग, कोकण येथे राज्यातील सर्वाधिक पाऊस पडतो.

▪️बुलढाणा जिल्हातील लोणार हे उल्कापातामुळे निर्माण झालेले खाऱ्या पाण्याचे सरोवर जगप्रसिद्ध आहे.

▪️ अजिंठा-वेरुळ लेणी, छत्रपती शिवरायांचा वारसा सांगणारे गडकिल्ले, कास पठार, गेट वे ऑफ इंडिया, विविध व्याघ्रप्रकल्प, अष्टविनायक, ज्योतिर्लिंगे, शक्तीपीठं इत्यादी अनेक ठिकाणं पाहण्यासारखी आहे.

महाराष्ट्राची मानचिन्हे

महाराष्ट्राची राजधानी : मुंबई
महाराष्ट्राची उपराजधानी : नागपूर
महाराष्ट्राची राज्य भाषा : मराठी.
महाराष्ट्राचे राज्य फळ : आंबा
महाराष्ट्राचा राज्य प्राणी : शेकरू
महाराष्ट्राचे राज्य फूल : मोठा बोंडारा / ताम्हण तामण / जारूळ बोंद्रा / बुंद्रा
महाराष्ट्राचा राज्य पक्षी : हारावत
खेळ : कबड्डी
गीत : जय जय महाराष्ट्र माझा
नृत्य : लावणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!