Women ST Travel Discount : बस प्रवासात महिलांना 50% सूट, पण नियम अटी काय आहे? जाणून घ्या सविस्तर..!

Women ST Travel Discount : अधिवेशनात महिलांकरिता बस प्रवासात 50% सवलतची मोठी घोषणा झाल्यानंतर त्याच्या अंमलबजावणीची सगळ्या महिला वाट पाहत होत्या, आणि अखेर 17 मार्चपासून सरकारकडून सवलत देण्याचा GR जाहिर करण्यात आला. आता महिलांना प्रवासात 50 % सवलत मिळाली, मात्र प्रवासासाठी रिझर्वेशन करता येईल का? महिलांसाठी वेगळे तिकीट असणार की सर्वांना सारखेच तिकीट असणार? सवलत असलेली नेमकी बस ओळखायची कशी? ए. सी. बसला सवलत असेल की फक्त नॉन ए.सी. बसला? जाणून घ्या सविस्तर माहिती..

📃 या योजनेचे नियम व अटी Women Scheme
◆ सर्व महिलांना सर्व प्रकारच्या बसेसमध्ये 50 टक्के सूट, आता यामध्ये साधी, मिनी बस, निम-आराम म्हणजेच एशियाड बस, विनावाता-नुकुलित शयन-आसनी म्हणजे नॉन ए.सी. स्लिपर कोच बस, आणि शिवशाही, शिवनेरी, शिवाई या तिन्ही साध्या आणि ए.सी. बसमध्ये 50 % सवलत 17 मार्चपासून लागू करण्यात आली आहे…

◆ दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भविष्यात महामंडळात नव्याने दाखल होणाऱ्या सर्व प्रकारच्या बससाठी ही सवलत लागू असणार. महिलांसाठी सवलत Women Scheme असलेल्या तिकीटाची रंगसंगती वेगळी असणार आहे.
◆ प्रवासी भाड्यातील अपघात साहाय्यता निधी आणि ए.सी. बस सेवांकरीता वस्तु व सेवा करची रक्कम आकारण्यात येणार. समजा तुमचं तिकीट 10 रुपये असेल तर त्यावर तु्म्हाला 5 रुपये सवलत मिळेल आणि त्यावर 2 रूपये कर म्हणजे तुम्हाला 7 रूपयाचे तिकीट काढावे लागणार.

◆ या योजनेंतर्गत तुम्ही राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये कुठेही फिरू शकता, पण का राज्याबाहेर जायचे असेल तर तुम्हाला तिकीटाचा आहे तो दर द्यावा लागणार आहे, म्हणजे जर तुम्ही मुंबईपासून बेळगावला जाण्यासाठी निघालात तर तुम्हाला महाराष्ट्राच्या सीमेपर्यंतच ही 50% सवलत लागू होणार, तिथून पुढे पूर्ण तिकीट आकारले जाईल.
◆ महत्त्वाची गोष्ट म्हणजे, शहरी वाहतुकीस महिलांना ही सवलत मिळणार नाही, म्हणजे तुम्ही ठाणे ते पनवेल, कल्याण ते ठाणे एसटीने प्रवास करत असाल तर तुम्हाला ही योजना लागू होणार नाही…
◆ यामध्ये महिलांना रिझर्वेशन करून प्रवास करायचा विचार करत असतील तर त्यांना ही सवलत लागू होणार नाही, म्हणजे प्रवास करतानाच तुम्हाला लगे हात तिकीट काढून या सेवेचा लाभ घेता येऊ शकतो.. यात महिलांनी पुढच्या तारखांचे आगाऊ आरक्षण केले असेल तर तुम्हाला परतावा मिळणार नाही.

◆ 5 ते 12 वयोगटातील मुलींना यापुर्वी प्रमाणेच 50 टक्के सवलत म्हणजे हाफ तिकीटदर आकारला जाईल
◆ 75 वर्षांवरील महिलांसाठी अमृत जेष्ठ नागरिक योजना लागू होत असल्यामुळे त्यांना फुकट प्रवास करता येणार. यामध्ये 65 ते 75 वयोगटापर्यंतच्या महिलांना सवलतीचा नियम लागू होणार…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!